ब्रुनेई सुलतान स्वत; विमान चालवीत भारतात दाखल
नवी दिल्ली :
आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रुनेई चे सुलतान हसनल बोल्किया गुरुवारी ५ हजार मैलाच प्रवास करून भारतात दाखल झाले. विशेष म्हणजे सुलतानांनी स्वतः जबो जेट विमानाचे सारथ्य करून हा प्रवास केला आहे. ते यंदाच्या प्रजासत्ताक संचलानाचे पाहुणेही आहेत. भारतात पोहोचताच त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.गुरुवारी आसियान परिषद पार पडली असून या परिषदेसाठी आलेले अन्य देशांचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पाहुणे आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ब्रुनेई चे सुलतान प्रथमच भारतात आले आहेत. गतवर्षी त्यांच्या सत्तेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला होता. सुलतान अतिश्रीमंत परिवारातील एक आहेत. त्याच्याकडे मालकीची विमाने आहेत तसेच त्यांना महागड्या कार चाही शौक आहे. त्याच्या संग्रही २२५० हून अधिक कार असल्याचे सांगितले जाते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें