- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

सेलुत  बंद व रस्ता रोको शांततेत 
 
समशेर खान.
सेलु :प्रतिनिधि
भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक महारणसंग्रामातील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातुन आलेल्या  लाखो भिमसैनिकांना     सोमवार १ जानेवारी रोजी अचानक काही समाज कंटकांनी अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनसमुदायावर भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार ३ जानेवारी रोजी दुसरे दिवशी बंद हकेला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.   सेलु येथे समाज बांधव यांच्यावतिने,  बंद  बरोबरच  रस्ता रोको करण्यात आला होता.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संघटनाचे पदाधिकारी  सहभागी झाले होते. त्यांच्या वतीने तहसिलदार  यांना निवेदन  देण्यात आले. या दिलेल्या निवेदनात  हल्लेखोरावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.   मिलिंद सावंत,अशोक अंभोरे, गौतम कनकुटे, लताबाई नाटभजे,मिनाताई बंदुके,  निकाळजे,विजय खेबाळे,शेख इस्माईल,दिपक धापसे, सिद्धार्थ गायकवाड,अमोल वाहुळे, रवि वाहुळे,अशोक पाईकराव, संजय भाग्यवंत, भारत काकडे,आदींसह समाज बांधवांनी, पुढाकार घेतला होता. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त होता. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें