- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 28 जनवरी 2018

चांगल्या माणसांच संघटन होणे गरजेचे
           - सुधाकर सुरडकर
सेलू : येथील नूतन महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आजी-माजी कर्मचारी स्नेह मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक सुधाकर सुरडकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की,"आजही चांगूलपणा,माणूसकी मोठ्या प्रमाणात आहे.आजही चांगले लोक जास्त आहेत. पण ते एकञित,संघटित नाहीत.जर आपल्याला सकारात्मक बदल हवा असेल तर चांगल्या माणसांचे संघटन होणे गरजेचे आहे." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते. तर मंचावर माजी प्राचार्य द.रा.कुलकर्णी,संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे,सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकरावजी कोठेकर,जयप्रकाशजी बिहाणी,  प्राचार्य डॉ.जे.एन.मंञी,पर्यवेक्षक प्रा.एन.एच.काळे, सुवर्ण महोत्सव समितीचे समन्वयक प्रा.दयानंद जामगे यांची उपस्थिती होती. सुधाकर सुरडकर पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," आजच्या काळात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले असून. या विकृतीपासून स्वतःला वेगळं ठेवून सेवा देणाय्रा दोन संस्था आहेत पहिली म्हणजे कर्मविर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था आणि दुसरी सेलूची नूतन विद्यालय शिक्षण संस्था. त्यांनी एक अपेक्षाही व्यक्त केली ती म्हणजे, प्रत्येकात एक मुल,मित्र आणि वडील आहेत.गरज आहे ती एक दुसय्रांत प्रवेश करण्याची.वरिष्ठ समजून स्वतःला एका कुंपणात अडकून घेऊ नका तर मुक्त जगा म्हणजे कळेल जीवनाचा आनंद काय आहे." स्वागतपर मनोगत प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले.प्रास्ताविक सुवर्ण महोत्सव समितीचे संयोजक उपप्राचार्य यादवराव गायकवाड यांनी केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आजी-माजी कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.प्रकाश कामतीकर,प्रा. विश्वास वसेकर, अ.स.जोशी आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.  माजी कर्मचारी सन्मान सोहळ्याचे सुञसंचालन प्रा.मोहन पाटील,प्रा.हेमचंद्र हडसनकर यांनी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजाराम झोडगे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.वसंतराव पांचाळ यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें