- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

सोनपेठ येथील सेवानिवृत्त वैद्यकिय अधिकारी डॉ .पी.जी.निर्मळे यांचे निधन

------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभुअप्पा गणपतअप्पा निर्मळे यांचे आज दि.२५ जानेवारी रोजी दुपारी राहत्या घरी निधन झाले. १९७४ साली येथील वैद्यकीय सेवेत रुजू झाले होते. त्यांच्या सेवेचा दीर्घकाळ हा शेळगाव (महाविष्णू)येथे गेला होता. मनमिळावू व शांत स्वभाव, गरीबाबद्दल कणव आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी सेवा करताना अनेक रुग्नांवर उपचार केले तसेच आपल्या मुलांवरही त्यांनी चांगले संस्कार केले आहेत. त्यांची मुले सतीश व श्रीकांत हे अभियंता म्हणून कार्यरत आहेत,  संजीव हे प्राध्यापक आहेत तर संतोष निर्मळे हे वैद्यकीय औषधी व्यवसायात चांगले व्यापारी म्हणून ओळखले जाते. स्व.निर्मळे यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॅा.निर्मळे यांच्या निधनाने एक चांगला व्यक्ती गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज सांयकाळी ७ वाजता सोनपेठ येथील विरशैव समाज स्मशानभुमी येथे अंतिम संस्कार करण्यात येनार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें