- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 30 जनवरी 2018

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जीवनात बंधुभाव जोपासावा

- मा.अ.ज.क.चे -शेख मुनिरोद्दिन  

प्रतिनिधी.गोकुलदास लोया.
गंगाखेड : रणरागिणी वृद्धाश्रम कांदलगावच्या वतीने 69 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्रधाश्रमाचे व्यवस्थापक मारोती रुपला चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर दैनिक आदर्श गावकरीचे पत्रकार बालासाहेब कदम यांच्या वाढदिवसाच्या योग साधत कदम परिवाराच्या वतीने रणरागिणी वृद्धाश्रमास वृधासाठी बसण्यासाठी ६ खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या. ध्वजारोहण झाल्यानंतर कदम यांच्या मित्रांनी व सहकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मानव अधिकार जस्टीस कमिशनचे परभणी जिल्हा संपर्कप्रमुख शेख मुनिरोद्दिन हे होते. ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले १९४७ ला भारत देशाला स्वतंत्र मिळाले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली व २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली. म्हणून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जीवनात बंधुभाव जोपासावा यावेळी नागनाथ नेजे, बाळासाहेब कदम, पिराजी कांबळे, गणेश कांबळे, विलास लांडगे, सिद्धार्थ हत्तिअम्बिरे, उत्तम काळे, व्रधाश्रमाच्या संचालिका कु. सविता चव्हाण, रुपला चव्हाण कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब कदम यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साबणे यांनी करत शेतकरी बांधवांच्या जीवनावर असलेली “ आत्महत्या नाही पर्याय” हि स्वलिखित कविता सादर केली तर आभार प्रदर्शन रणरागिणी व्रधाश्रमाच्या संचालिका कु. सविता चव्हाण यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण सिरसकर, अनिता राठोड, नंदा राठोड, सखुबाई सोळंके, व गावकरी मंडळी यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें