भोकरदन शहरातील जनतेने हल्लाबोल मोर्चेत हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे : नसीम पठाण नगरसेवक
भोकरदन प्रतिनिधि : शेख सलिम
केंद्र व राज्य सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २४ जानेवारी रोजी जाफराबाद येथे होणाऱ्या हल्लाबोल मोर्चात भोकरदन शहरातील जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान युवा नगरसेवक नसीम पठाण यांनी केले.
या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी ,व्यपारी ,महिला आणि सर्व समाज घटक या सरकारच्या कामावर नाराज आहे, ही नाराजी व्यक्त करण्यासाठी व मराठा ,मुस्लिम आरक्षणच्या मागणीसाठी जाफराबाद तहसिल कार्यालयवर बुधवारी सकाळी दहा वाजता हल्लाबोल मोर्चा निघणार आहे तरी भोकरदन येथील जानते हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान नगरसेवक नसीम पठान यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें