साईबाबा बँकेला 'बँको पुरस्कार'
सेलू :- अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बँको पुरस्कार-2017 सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला दिनांक 19 जानेवारी2018 रोजी करण्यात आला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली.
सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या सहकारी बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. सन 2017 यावर्षीच्या बँको पुरस्कारासाठी तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संपूर्ण भारतामधील नागरी सहकारी बँक व्यवसाय रू. 51 ते 100 कोटीपर्यंत या विभागामध्ये पात्र ठरल्यामुळे साईबाबा नागरी सहकारी बँकेची निवड करण्यात आली होतीे. हैदराबाद येथील नोवाटेल एअरपोर्ट या हाॅटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 19 जानेवारी 2018 रोजी 'अॅडव्हान्टेज 2018' या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी सदर पुरस्काराचे वितरण झाले आहे तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री म हेमुद अली साहेब डॉ ए एस राम शास्त्री संचालक, आय डी आर बी टी हैदराबाद रमेश कुमार बंग संचालक एन ए एफ सी यु बी न्यू दिल्ली ,व अशोक नाईक ,अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते पुरस्कार चिन्ह देण्यात आले साईबाबा नागरी बँकेने अल्पावधीत यशोशिखर गाठले आहे आता पर्यंत बँक च्या 6 शाखा आहे व बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक बालचनदानी कन्ह्यालाल, गंगाधर आडळकर, दत्तात्रय आंधळे, सुभाष चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी हा पुरस्कार सिवकरला
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें