मानवत येथे आंबेडकरी जनतेच्या वतीने शांततेत निषेध.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०३: भिमाकोरेगाव येथे आंबेडकरी समाजावर झालेल्या दगडफेकेच्या निषेधार्थ
आदरनिय प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला मानवत शहरात शांततेत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला .
भिमाकोरेगाव येथे झालेल्या आंबेडकरी समाजावर मनूवाद्यानी केलेल्या दगडफेकेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघाचे प्रमुख अदरनिय प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंद च्या हाकेला जूनी नगरपरिषद समोरून आज दि.३ जानेवारी सकाळी ११ वाजता भारीप बहुजन महासंघाच्या वतिने व शहरातील सर्व पक्षानी या महाराष्ट्र बंद ला पाठींबा दिला व निषेध मोर्चा काढण्यात आला .मानवत तहसिल कार्यालयात जाऊन तहासिलदार आश्विनी जाधव यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन दिले या निवेदनात नमुद करण्यात आले कि १ जानेवारी २०१८ रोजी भिमाकोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी देशभरातून आलेल्या आंबेडकरी समाजावर मनूवाद्याकडुन दगडफेक करण्यात आली. या दगडफेकेत एक युवकाचा प्राण गेला तर हाजारो जखमी झाले. या दगडफेक चा प्रमुख सुञधार संभाजी भिंडे व मिलींद एकबोटे यांना अटक करा या मागणी चे निवेदन देण्यात आले. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे नेते धम्मपाल सोनटक्के , माजी नगरअध्यक्ष अमृत भदर्गे , नगरसेवक अंनद भदर्गे , नगरसेवक राजकुमार खरात , आशोक पंडीत , संपत पंडीत , भारीप चे शहरध्यक्ष विशाल धापसे ,महेद्र ठेगे भिमशक्ती चे अध्यक्ष शैलेष वटमारे , छगन भदर्गे , रवी पंडित, अँड मिलींद तुपसमुंद्रे , बि .के.साळवे , दिपक ठेंगे , आमोल मगर , मेघनाथ भाले , वाजेत भाई , आंबेडकरी युवामंच चे प्रमुख विजय खरात व शहरातील व तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मानवत पोलिस स्टेशन च्या वतीने तगडा बंदोबंस्त ठेवण्यात आला होता.
बुधवार, 3 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें