मानवत येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०३: सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मानवत शहरातील साईनाथ अस्थीव्यंग व मूकबधीर मतीमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
सावित्रीबाई जयंती दिनी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी न करता वायफळ खर्च टाळून सामाजिक उपक्रम शहरातील युवकांनी राबविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक दत्ताराव चौधरी आणि प्रमुख पाहुणे गजानन बारहाते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा गोविंद रासवे यानी केले . यावेळी मोहन महीपाल,सचिन चौधरी, कृष्णा शिंदे,आकाश राऊत,विक्की जाधव,सोमेश सत्वधर कृष्णा बारहाते,सुमित शिंदे,आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय सावता ग्रूप, सिंहगर्जना मित्र मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें