*ग्रामसेवक लाच स्वीकारताना पकडला*
---------------------------------------------
सोनपेठ / प्रतिनिधी
तालुक्यातील धामोनी येथील रहिवासी वय वर्ष २७ याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय परभणी येथे तक्रार दिली की, त्यांचे ग्रामपंचायत धामोनी ता.सोनपेठ मार्फत शासनाकडून मिळालेल्या निधीतून ग्रामविकासाची कामे पूर्ण केले त्या कामाचे चेक देण्या करिता ग्रामसेवक प्रशांत वसंत कांबळे याने पूर्वी दिलेले दोन चेक आणि आज देणार असलेले चेकच्या मोबदल्यात ३०,००० रुपये लाचेची मागणी करत आहे तरी त्याचेवर योग्य ती कारवाई करावी वगैरे तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय परभणी येथून करण्यात आलेल्या कारवाईत दि. ०९ जानेवारी २०१८ मंगळवार रोजी धामोनी ता.सोनपेठ येथे जावून पडताळणी कार्यवाही करून नंतर सापळ्याचे आयोजन केले असता ग्रामसेवक प्रशांत वसंत कांबळे यांनी तक्रारदार तरूणा कडून ३०,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले व तडजोडीअंती पहिला हप्ता १५००० रुपये लाच स्वीकारली असता त्याला लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले असून लाचेची रक्कम त्याचे ताब्यातून हस्तगत करण्यात आली आहे. त्याचे विरुद्ध सोनपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती, सदरचा सापळा कारवाई हि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक एन.एन.बेंबडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय परभणी,पोलीस हवालदार लक्ष्मण मुरकुटे,जमील जहागीरदार,पोलीस नाईक शेख मुखीद,पोलीस शिपाई अविनाश पवार,माणिक चट्टे,अनिल कटारे,वाहन चालक पो.ना.भालचंद्र बोके व रमेश चौधरी यांनी यशस्वीपणे कामगिरी पार पाडली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक एन.एन.बेंबडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय परभणी हे करीत असून परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी भ्रष्टाचार विरुद्ध तक्रार देण्यासाठी मोबाईल संपर्क पोलीस उप अधीक्षक एन.एन.बेंबडे मो.9923100588,पो.नि.दिनकर गावंडे मो.9823748585,पो.नि.अनिल गव्हाणकर मो.9823616145,पो.नि. विवेकानंद भारती मो.9423429786 तसेच दूरध्वनी क्रमांक 02452-220597 व टोल फ्री क्रमांक 1064 आदींना संपर्क साधा असे आवाहन केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें