आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत
सेलु जितूंर विधानसभा प्रमुख तथा जि प गट नेते राम पाटील यांचा पुढाकार
सेलु- प्रतिनीधी
तालुक्यातील रवळगाव येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 03 जानेवारी रोजी घडली होती याची तत्काळ दखल घेत शिवसेनेचे सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष तथा जि प गटनेते राम पाटील यांनी त्या आत्महत्याग्रस्त कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना रोख 10 हजाराची आर्थिक मदत केली आहे.
या बाबत अधिक माहिती तालुक्यातील रवळगाव येथील शेतकरी श्री दिपक लक्शमण रोडगे वय 36 वर्ष या शेतकऱ्याला जेमतेम जमीन आहे यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते यातच स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज घेतलेले होते म्हणून संसाराचा गाडा कसा चालवायचा व बँकेचे कर्ज कसे फेडायचे याच विवनचनेत त्यांनी 03 जनेवारी रोजी रात्री 9:30 वाजता आपल्या घरी विषारी औषध प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपली होती म्हणून या घटनेची माहिती मिळतात राम पाटील यांनी तत्काळ कुटुंबाचा घरी जाऊन सांत्वन केले व रोख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली त्यांच्या या सामाजीक बांधिलकी जपली आहे यावेळी त्यांच्या सोबत शि.ता.प्रमुख रंजीत गजमल,आतुल डख,संतोष रोडगे,किषन रोडगे,गुलाबराव रोडगे, गुलाब वाघमारे,आसारामदादा रोडगे,गणेश रोडगे , आंगद डख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें