चौदा प्रा.आ.केंद्रात १८ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती
जि.प.आरोग्य सभापती भावना नखाते यांनी केला होता पाठपुरावा .
आरोग्य विभागाची माहीती .
परभणी (जिल्हा प्रतिनीधी )
परभणी जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रात १८वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने दिली आहे .जि.प.आरोग्य सभापती भावनाताई आनिलराव नखाते यांनी याबाबत पाठपुरावा केल्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सहज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे .
ग्रामिण भागातील जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भावना नखाते
यांचा सुरूवातीपासुन प्रयत्न आहे त्यांनी बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथे सुसुत्रता आणली .परंतू वैद्यकिय आधिकारी यांच्या रिक्तपदामुळे आरौग्य विभागाला मोठी कसरत करावी लागत होती .आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सभापती भावनाताई नखाते यांनी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांची २४ रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी केली होती .त्यानंतर पाठपुरावा केल्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी १८ वेद्यकिय अधिकारी मिळाले जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रात हे वैद्यकिय अधिकारी रूजू झाले आहेत .यामुळे ग्रामिण भागातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे .
नियुक्त झालेले वैद्यकिय अधिकारी आसे विवेक पतंगे (जांब) ,अझर आन्सारी (ताडकळस ), स्मिता चव्हाण (चाटोरी ), स्वप्निल जाधव (रावराजूर ),कपील निकाळजे (हादगांव बु) ,प्रसाद केंद्रेकर (वाघाळा) ,गोविंद कदम व नेहा सोन्नेकर (देऊळगांवगात ) ,मनिषा गोरे व केशव डाखुरे (वालूर ), शहाजी कुरे, रोहान सरोदे ,रमेश ढाकरे (सोनपेठ) ,आशुतोष चाटे (राणीसावरगांव) ,कुणाल
शिसोदिया (कोद्री ) अझर आन्सारी (असेगांव ) ,सय्यद अहेमद (आडगांव),अमेर चाँद (वझर ) आसे १८ वैद्यकिय
अधिकारी रूजू झाले आहेत .
उर्वरीत सहा रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न चालू आहे
परभणी जिल्ह्यात वैद्यकिय अधिकारी यांची २४पदे रिक्त होती . त्यापैकी १८ पदे भरली असुन उर्वरीत सहा पदे तात्काळ भरण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे जि.प.उपाध्यक्षातथा आरोग्य सभापती भावनाताई नखाते यांनी सांगितले .
ग्रामिण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.
जवाब देंहटाएं