- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 जनवरी 2018

वाढदिवसा निमित्त शाळेला पुस्तके भेट
------------------------------------
जि.प.केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ येथील उपक्रम
------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
सोनपेठ शहर व तालुक्यात मागील कांही वर्षांपासुन वाढविवस व अन्य प्रसंगाचे औचित्य साधुन मोठ्याप्रमाणात पुस्तकांची देवान-घेवान करुन शालेय विद्यार्थी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करित असल्याचे दिसुन येत आहे. यात पालकवर्ग हिरिरीने पुढे येतात. ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ सुद्धा त्यांच्या पातळीवरुन परभणी जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर वाचन संस्कृती जोपासन्यासाठी परिश्रम घेत आहे.  या सर्वांच्या  प्रयत्नांतुन तालुक्यातील अनेक शाळा ग्रंथसंपन्न झाल्या आहेत.
येथील येथील जिल्हा परिषद केंद्रिय कन्या शाळेतही वाढदिवसाच्या माध्यमातुन अनेक पुस्तके जमा झाली असल्या वृत्त आहे. या शाळेची वाढदिवसा निमित्त पुस्तके भेट देण्याची परंपरा कायम राखत शाळेचा विद्यार्थी चि.तेजस नयनिस गुजराथी (ईयत्ता तिसरी) याने आज त्याचा  वाढदिवस विद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन साजरा केला. शाळेचे मुख्याध्यापक शेषराव राठोड व त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या प्रेरणेतुन व मार्गदर्शनाने विद्यार्थी मोठ्या आनंदाने या उपक्रमात सहभागी होत आहेत. रिकाम्या तासिकेत मुले मुक्तद्वार पद्धतीचे असलेल्या शाळेच्या या ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांचा मनमुराद आनंद लुटत असतात असे ग्रंथालय विभागाचे प्रमुख सहशिक्षक गादेवाड यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलतांना सांगीतले.
आजच्या या कार्यक्रमावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें