सोनपेठ ते शिर्डी पायी दिंडी २५ जानेवारी रोजी निघणार
--------------------------------------------------
श्री द्वारकामाई साई परिवाराच्या वतीने करण्यात आले आयोजन
------------------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर) सोनपेठ येथुन श्री द्वारकामाई साई परिवाराच्या वतीने पहिल्यांदाच
साई धाम शतकपूर्ती महोत्सव निमित्त सोनपेठ ते श्री शिर्डी पायी दिंडी चे आयोजन करणायात आले आहे. या पालखी सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष आहे. पालखी २५ जानेवारी रोजी सोनपेठ येथुन प्रस्थान करणार आहे. दिंडीचे ११ मुक्काम असुन ५ फेब्रुवारी रोजी रात्री शिर्डी येथे पोहोचनार आहे. या दिंडीचे साईबाबां च्या आर्शिवादाने व्यापक स्वरूप होत आहे.पायी दिंडी साठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या दिंडीत ज्या साई भक्तांना सहभागी होण्याची ईच्छा असेल त्यांनी दि.२३ जानेवारी २०१८ पर्यन्त संपर्क साधावा, दि.२३ जानेवारी नंतर आलेल्या फॉर्म चा विचार केला जानार नाही,याची नोंद घ्यावी. दिंडी ग्राम दैवत मारोती मंदिर सोनपेठ येथुन सकाळी ९ वा. निघणार आहे. या दिंडीत जास्तीत जास्त साई भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री द्वारकामाई साई परिवाराच्या वतीनं केलं आहे. पदयात्रेत येणा-या भक्तांनी अधिक माहिती साठी मो.९८६०२३०९७१, ९८८१२६३४४३,९४२३७३७७८४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीचे केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें