* *शिक्षणा सोबत खेळ महत्वाचा.आ.डॉ.राहुल पाटील,*
मराठवाडा साँफ्टबाँल लीग स्पर्धा शानदार उदघाटन
परभणी (समशेर खान )महाराष्ट्र राज्य साँफ्टबाँल संघटनेच्या मान्यतेने व परभणी जिल्हा साँफ्टबाँल संघटनेच्या वतीने परभणी येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे दि.२० जाने २०१८रोजी मराठवाडा लिग स्पर्धैचे शानदार उद्घाटन करण्यात आले आहे,
याप्रसंगी डॉ. राहुल पाटील म्हणाले शिक्षणा सोबत खेळ महत्वाचा, खेळ मनुष्याला ना सक्षम बनतो, कोणत्याही क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी मनुष्यालास शारिरीक, मानसिक, बौद्धिक दुष्टया सक्षम असला पाहिजे या सर्व बाबी खेळातून मिळतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू हे होते. उद्घाटक म्हणून आ.डॉ. राहुल पाटील,प्रमुख पाहुणे अर्थ व बाधंकाम जि.प. सभापती अशोक काकडे, जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे, मनपा सदस्य प्रंशसा ठाकूर, डॉ. वास्कर ,नांदेड सचिव प्रा.इम्तियाज खाँन, प्रा.रंमाकांत बनसोडे, भारत इंद्रोके, योगेश बरदाळे, कुष्णा कटारे, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. बी.वेंकटेश्वरलू अध्यक्षीय भाषणात म्हणाले साँफ्टबाँल हा खेळ सर्व स्तरावर खेळाला जातो तेवढाच सोपा खेळ आहे हा पुढील शैक्षणिक वर्षे त विद्यापीठाच्या स्तरावर समाविष्ट करण्यात येईल अशी घोषणा केली.
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील ८जिल्ह्यातील 12 संघ सहभागी झाले आहेत .दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा साखळीपध्दतीने खेळविण्यात येत आहेत .
यात लातूर वि .उस्मानाबाद सामन्यात लातूर 11 होमरननी विजयी , परभणी यंमी टंमी वि. माजलगांव दरम्यान 6 होमरन नी माजलगाव विजयी, जिमखाना परभणी वि. बीड दरम्यान , 10 होमरननी बीड विजयी, लातूर शहर वि. औरंगाबाद दरम्यान 7 रननी लातूर शहर विजयी. स्पर्धेचे
प्रास्ताविक रणजित काकडे, तर सुत्रसंचलन गणेश माळवे यांनी केले,आभार प्रदर्शन कैलास माने, यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी ते साठी आयोजन समितीचे सचिव प्रा.प्रसेन्नजित बनसोडे , डी. डी. सोन्नेकर, सतिश नावाडे, ओंकार खोत,अंगद सुतारे, श्रीकांत पांडे, गणेश दिक्षीत, अविनाश आघाव, डॉ. सचिन चव्हाण, संदिप तिवारी.बाबुराव गायकवाड, रवि गांवडे, सुबोध वीर परिश्रम घेत आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें