- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

वालूरात शांततेत कडकडीत बंद

प्रतिनिधी
वालूर:-सोमवारी भिमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवभर पहावयास मिळाले होते.विविध पक्ष,संघटनांनी बुधवार 3 जानेवारी रोजी राज्यात बंद ची हाक दिल्याने आज सकाळ पासूनच वालूर शहरातील आत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पुर्णत: बंद असून काही खाजगी इंग्रजी शाळांनी ही सुट्टी दिली आहे.एस टी आगाराने बस फे-या बंद ठेवल्या असून खाजगी वाहाने तुरळक प्रमाणात रस्त्या वरून जातांना दिसत होती. आजचा बंद दुपार पर्यंत अतिषय शांततेत सुरू असून  बंद मुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.पोलीस आणि विविध पक्ष संघटनांच्या वतिने शिस्त आणि संयम पाळण्याचे आवाहन करण्यात येत असून नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें