प्रख्यात कवी राजेश रेवले यांची श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या ग्रंथालयास भेट
--------------------------------------------------
*जग, समाज समजुन घेण्यासाठी वाचन महत्वाचे आहे- राजेश रेवले
--------------------------------------------------
सोनपेठ (राजेश खेडकर)
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त स्थानिक महाविद्यालयात काल दि. १० जानेवारी रोजी संत जनाबाई साहित्य परिषद गंगाखेडचे सदस्य, कवी प्रा.राजेश रेवले यांचे काव्य वाचन व प्रा. हनुमान व्हरगुळे यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी 'ग्रंथदान' उपक्रमातुन चर्चेत असलेल्या श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या ग्रंथालयालयास भेट दिली. ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथसंपदा व समाधानकारक असलेली विद्यार्थी वाचक संख्या पाहुन समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना त्यांनी कांही रचना ऐकवल्या. हॅालमधील उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या
*काळ्या आईची सेवा माझा परीपाठ आहे, शेतकरी आहे मी, माझा कणा ताठ आहे....*
या शेतकरी जिवनावर आधारीत ह्रद्यस्पर्शी कवितेस टाळ्याच्या कडकडात उत्तम साथही दिली. शेवटी अगदी मोजक्या शब्दात राजेश रेवले यांनी वाचनाचे महत्व पटवुन देतांना, *जग, समाज समजुन घेण्यासाठी वाचन महत्वाचे आहे* असे सांगीतले.
यावेळी प्रा.हनुमान व्हरगुळे, प्रा. सखाराम कदम, सोनपेठ दर्शन चे संपादक किरन स्वामी, विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ जोशी जोशी व सहशिक्षक नामदेव निळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना कविता ऐकवल्याबद्दल तसेच वाचनाचे महत्वही पटवुन दिल्याबद्दल विद्यालयाचे ग्रंथपाल राजेश्वर खेडकर यांनी सर्वांचे आभारी व्यक्त केले.
शुक्रवार, 12 जनवरी 2018
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें