महिला सक्षमीकरण सोहळा संपन्न
-------------------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती निमित्त महिला सबलीकरण समिती, विशाखा समिती, महिला अत्याचार प्रतिबंधक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याचे उद्घाटन हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम व प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांनी केले होते. व सांगता प्रसंगी अध्यक्ष परमेश्वरराव कदम तर प्राचार्य शेख शकिला, प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी व प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी यांची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती दरम्यान क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पत्रक बनवणे स्पर्धा गितगायन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमधून ९७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. याचा समारोप आज हशिप्रमं चे अध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या हस्ते करण्यात सुत्रसंचालन प्रा. सखाराम कदम प्रास्ताविक ममता देवराये यांनी केले तर आभार प्रा. आरती बोबडे यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें