वालूरात शांततेत कडकडीत बंद
+वालुर येथील पुतळा विटंबनेच्या घटनेचे निषेध.
प्रतिनिधीवालूर:-सोमवारी रात्री वालुर येथे पूतळा विटंबनेची घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवर दिवसभर वालुर बंद होता आणि बुधवार वगळता गूरुवार रोजी विविध पक्ष,संघटनांनी गुरूवार 11 जानेवारी रोजी वालुर बंद ची हाक दिल्याने आज सकाळ पासूनच वालूर शहरातील आत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पुर्णत: बंद असून काही खाजगी इंग्रजी शाळांनी ही सुट्टी दिली आहे.एस टी आगाराने बस फे-या बंद ठेवल्या असून खाजगी वाहाने तुरळक प्रमाणात रस्त्या वरून जातांना दिसत होती. आजचा बंद सा.5 पर्यंत अतिषय शांततेत सुरू असून बंद मुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.पोलीस आणि विविध पक्ष संघटनांच्या वतिने शिस्त आणि संयम पाळण्याचे आवाहन करण्यात येत असून नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें