- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

*आजही स्त्रीया परिपूर्ण निर्नियक्षम नाही* .

स्त्रीयानी स्वकर्तुत्वावर जग जिंकले.

भराडी ता.सिल्लोड--(अजय.बाेराडे)
भारतात वैचारिक कायदेविषयक किती जरी नाविण्य आले तरी, आजही समाजात अनेक मतभेद विषमता दिसते.तोच विषय
स्त्रीयांच्या बाबतीत बघायास मिळतो.याच विषयावर सिल्लोड पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिक्षणमहश्री अशोक दादा गरुड यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधुन भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आजही स्त्री-पुरुष समानता आहे की नाही या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिक्षकासह विद्यर्थ्यानी सहभाग नोंदविला.स्त्री-पुरष समानता,मतभेद आहे की नाही यावर मुद्दे मांडत असतानी राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक, व्यावसायिक, क्रीडा, कला, आर्थिक ,रुढी, परंपरा, साहित्य ,वाणिज्य ,शैक्षणिक, वैज्ञानिक आधी मुद्द्यांना हात घालून वैचारिक मंथन केले .

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे प्रमुख कै. हिंमतराव भाऊ गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण श्रीमती मिरगे (मुख्याध्यापक एम. के .जी.एल. इंग्लिश स्कूल भराडी) श्रीमती सरस्वती सपकाळ,श्री.शिंदे डी.टी. यांनी केले .
वादविवाद स्पर्धेत शिवानी गणेश शिंदे प्रथम,अश्विनी पुंडलिक गोंगे द्वितीय,जयश्री संजय सोनवणे तृतीय,यांनी मिळवले तर,मुक्ता निकम, रोहिणी भगुरे, कोमल जाधव, अनुष्का वाघ, कुंटे कल्याणी, दिव्या  बैनाडे, लोखंडे अक्षय,नीलम टाकसाळे, आर्यन ढमाले, दीक्षा  वाघ , सोनल महाजन, वैशाली कायटे,पल्लवी खिल्लारे, आदि  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

त्याचप्रमाणे पर्यावरण जतन, मुलगा मुलगी भेद, झाडे लावा झाडे जगवा, यांसह विविध विषयांवर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात आदिती संतोष भोसले
प्रथम, सोनाली रघुनाथ वैष्णव  द्वितीय, अपर्णा जनार्धन वाघ तृतीय क्रमांक मिळवला.  रांगोळी स्पर्धेचे परीक्षण जाधव एस. आर, देशमुख डी. जी,शिंदे डी.टी. यांनी केले.

*मराठी विषयावर हस्ताक्षर स्पर्धा घेऊन त्यात   
आशिकेश काकड,रोहिणी खांडवे,रोशनी बिचारे
धनराज कबाड़े,भाग्यश्री घोंगटे,
हर्षदा साळवे
गणेश मरमट, रोहित घूमरे,तन्मय महाजनप्रतीक्षा राकडे,
उज्वला निकम,चैताली गोरे
गणेश गवळी,गायत्री साळवे,हर्शल मनगटे,कोमल जाधव,दीपक सुंसुन्द्रे,अभिषेक मनगटे,अभिषेक काळे,निकिता उटाडे,गौरी जोशी,
जयश्री भगूरे,नितिन मनगटे, विशाल मानकापे,
क्रमांक मिळविले हस्ताक्षर स्पर्धेचे सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .
तिन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण शालेय साहित्य देऊन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते
मा.सरपंच संजय निकम कोटनान्द्रा, शिवराज खोमणे भराडी,डॉ.शैलेश काळे भराडी,बाजीराव काकडे,देवीदास नेव्हारे,समाधान सोनवणे,भगवत कबाड़े,मुमताज पठाण,शिवाजी आमटे,शीराज पठाण,राजू घुले,बब्बू पठाण,दिनेश राकडे,सईद पटेल,कृष्णा शिंदे,आशपाक शाह,विजय काकडे यांसह शालेय वाहनांचे चालक मालक
यांची उपस्थिती होती . प्रास्ताविक मुख्यद्यापक रायभान जाधव यांनी,संचलन विठ्ठल गव्हाने यांनी तर आभार देशमुख वाय.बी.यांनी केले.
स्पर्धा व कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंदांनी सहभाग नोंदवुन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें