- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

साजरी केली मकर संक्राती

अजय बोराडे 

सिल्लोड तालुक्यातील भराडी  येथील श्रीविठ्ठल रुख्मिणी मंदिरात मकर संक्रातीनिमित्त महिलांची गर्दी बघण्यास मिळाली. मकर संक्रात हा सन वर्षातील पहिला सन असतो नववधू तसेच महिला वाण देण्यासाठी देवीच्या मंदिरात जातात.

दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (13 जानेवारी), संक्रांती (14 जानेवारी) व किंक्रांती (15 जानेवारी) अशी नावे आहेत. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला मकर संक्रांत असं का म्हणतात. संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी तीळ मिश्रीत पाण्याने स्नान करायचे. तीळाची भाकरी, वांग्याचे भरीत अन् मिश्र भाजी करण्याची प्रथा आहे. तिळाची गरम गरम भाकरी, भरीत, चविष्ट भाजी, सोबत लोणी, असा विशेष बेत असतो. संक्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्याप्रमाणे आपण दसर्‍याला मोठ्या लोकांना आपट्याची पाने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे संक्रांतीलाही तिळगूळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढवा, यासाठी तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला असा संदेश थोरामोठ्यांना दिला जातो. या सणानिमित्‍त विठ्ठल रूख्मिणी मंदिरात मोठी गर्दी बघावयास मिळाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें