- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 23 जनवरी 2018

जिंतूरात एक हजार विद्यार्थ्यांनी दिली धार्मिक परीक्षा

* मौ. तजम्मुल अहमद खान यांच्या पुढाकाराने परीक्षा सुरळीत


   जिंतूर/  निशाद आहेमद
                 
जिंतूर तालुक्यातील बारा परीक्षा केंद्रावरून घेण्यात आलेल्या धार्मिक परीक्षेत तालुक्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर मौ. तजम्मुल अहमद खान यांच्या पुढाकाराने बारा ही परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली.
  जिंतूर तालुक्यातील मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षणाचे ज्ञान व्हावे यासाठी दरवर्षी मालेगाव येथील धार्मिक मदारश्याच्या वतीने एकाच वेळी सबंध महाराष्ट्रात शालेय विद्यर्थ्यांकरीता धार्मिक माहितीवर आधारित परीक्षेचे  आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून जिंतूर शहरातील डॉ. झाकेर हुसेन उर्दू स्कुल, विलासराव देशमुख उर्दू स्कुल, सरसय्यद अहमद खान उर्दू स्कुल, दारूल उलूम मोहमदिया, जमियातूत ताहेरात, जमियातूत तैय्यबात तसेच तालुक्यातील वालुर, कौसडी, कोक, माक, देवसडी, झरी या बारा परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत तालुक्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी हजरत मौलाना काझी अब्दुल आहाद अझहरी, मौलाना जुबेर मिल्ली, मौलाना सईद मिल्ली, मौलाना निहाल अहमद, हफेज फय्याज, फजरर्हेमान मिल्ली, मास्टर अब्बास आदिंनी परिश्रम घेतले. तर मौलाना तजम्मुल अहमद खान व मौलाना जलील ताबिश मिल्ली यांच्या पुढाकाराने परीक्षा सुरळीत पार पडली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें