- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 24 जनवरी 2018

बदनापूर तालुक्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस बदनापूर येथून सुरुवात

शे.अजहर बदनापुरकर
जालना जिल्हा  प्रतिनिधी.
बदनापूर, दि. 23 (सा.वा.): हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मान्यता दिली असून या योजनेची अनौपचारिक सुरुवात माजी आ. संतोष सांबरे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती बदनापूर येथे झाले. या योजनेतंर्गत ज्या गावात ग्राम पंचायत कार्यालये नाहीत त्या गावात कार्यालय शासनाकडून बांधून देण्यात येणार असून बदनापूर तालुक्यातील 27 गावांना या योजनेचा लाभ्‍ होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त ज्या गावांना ग्राम पंचायत कार्यालय नाही असा गावाना कार्यालय बांधणीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत बांधणी योजनेची घेाषणा केली आहे. या योजनेतंर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 12 लक्ष आणि 1000 ते 2000 लोकसख्ंया असलेल्या गा्रमपंचायतींना 18 लक्ष निधी मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत 10 टक्के लोकवर्गणी व 90 टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे. या योजनेचा लाभ्‍ राज्यभरातील आर्थीकदृष्टया कमकुवत किंवा दुर्गम भागातील सुमारे 4 हाजर 252 ग्राम पंचायतींना मिळणार आहे.

या योजनेचीअनौपचारिकरित्या सुरुवात आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बदनापूर येथील पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. संतोष सांबरे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून गट विकास अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, किसानसेनेचे जिल्हा समन्वयक भानुदास घुगे, जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण, पंचायत समिती सभापती अश्विनी मदन, उपसभापती श्रीराम कान्हेरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बदनापूरचे माजी तालुकाप्रमुख अंकुश शिंदे यांनी ग्रामीण विकास फक्त शिवसेनाच करू शकते, याची ग्वाही देऊन ग्रामीण विकासासाठी शिवसेना कायम प्रयत्नशील असते, त्यामुळे आता शिवसैनिकांनीही केलेल्या कामाचा प्रसार सामान्य नागरिकांपर्यत करावा, असे आवाहन केले. यावेळी तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांनी या योजनेबाबत माहिती देतानाच सांगितले की, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ही योजना बदनापूर येथे कार्यान्व्ीत करत आहोत, त्याबद्दल त्यांनी गटविकास अधिकारी डॉ. फणसे यांना लवकरात लवकर तालुक्यातील ज्या ग्राम पंचायतींना कार्यालये नाहीत त्या ग्रामपंचायतींना कार्यालये बांधणीसाठी प्रस्ताव बनवून पाठवावे, असे सूचविले. यावेळी किसान सेनेचे जिल्हा समन्वयक भानुदास घुगे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्य जनतेत रुजलेले असून या नेत्यांने सामान्य कार्यकत्यांना सत्तेत सहभागी करून घेतल्याचे उदाहरणे देऊन त्यांच्या अलौकिक कार्यावर प्रकाश टाकला.
माजी आमदार संतोष सांबरे यांनी बदनापूर तालुक्यातून अनौपचारिक उद्रघाटन झालेल्या मातोश्री योजनेबाबत प्रकाश टाकून शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा दरारा विशद केला. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की ते एकदा जम्मू येथे गेलेले असताना तेथे त्यांना एक हरीयाना येथील एक आमदार भेटले त्यांना परिचय देताना आ. सांबरे यांनी मी शिवसेनेचा आमदार असल्याचे सांगताच त्या आमदाराने संपूर्ण भारतात एकच वाघ आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसीध्द आहेत. त्यांना मानणारा वर्ग संपूर्ण भारतात असल्याचे विशद केले. तसेच त्यांच्या जयंती दिनी मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेची सुरुवात बदनापूर तालुक्यातून होत असल्याचे सांगून या योजनेतंर्गत तालुक्यातील म्हसला, भातखेडा, असोला, पिरसावंगी, वंजारवाडी, गोकूळवाडी, सिरसगाव घाटी, भाकरवाडी, खामगाव, जवसगाव, भीलपुरी, सायगाव, बावणेपांगरी, मांडवा, वाघ्रुळ, निकळक, पाडळी, खादगाव, दावलवाडी, मात्रेवाडी, कंडारी बु., हिवरा-राळा, मांजरगांव आदी गावांना ग्राम पंचायत कार्यालये उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे गेवराई बाजार विभागचे सदस्य कैलास चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालण अंबादास कोळसकर यांनी तर आभार शहरप्रमुख राजेंद्र जऱ्हाड यांनी मानले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, अंबडगावचे सरपंच राजेश जऱ्हाड, अरुण डोळसे, रवी बोचरे, युवासेनेचे तालुकाप्रमुख बळीराम मोरे, तालुका संघटक नंदकिशोर दाभाडे, भगवान शिंदे, भरत मदन, शिकूर बाबा मिर्झा, सीताराम गोरे, प्रवीण बोचरे आदींसह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, बदनापूर
बदनापूर शहर शिवसेनेच्या वतीनने बदंनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी गणेश टाक, शहरप्रमुख राजेंद्र जऱ्हाड, संजय बळप, शहर संघटक कैलास खैरे, विलास पवार, शिकूर बाबा मिर्झा, बाबासाहेब पवार, अंबादास कोळसकर, सुनील बनकर, संदीप टेहरे आदींची उपस्थिती होती.

अकोला येथे निंबंध स्पर्धा
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त निबंध, भाषण व गायन स्पर्धा येथील जिल्हा परिषद प्रशाळेत आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच येथील विद्यार्थ्यांना बाळकडू हा चित्रपटही दाखविण्यात आला. यावेळी विजयी स्पधर्कांना विविध रोख पारितोषिकेही वाटण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादू गिते, राजू थोरात, बाबासाहेब केकारण, सानप, नवनाथ गिते आदींनी प्रयत्न केले. या  कार्यक्रमाचे आयोजन रूषिकेश थोरात यांनी केले.

धोपटेश्वर, ता. बदनापूर
तालुक्यातील धोपटेश्वर येथेही हिंदूह्रदयस्रमाट यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुका संघटक नंदकिशोर दाभाडे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला अर्जुन दाभाडे, रमेश कोल्हे, गजानन दाभाडे, मंजीत दाभाडे, अनिल दाभाडे, एकनाथ कोल्हे आदींची उपस्थिती हेाती. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें