भराडी येथील संत सावता पुरुष बचत गटाची चौथ्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल ;
अनेक गरजूंना लाखो रुपयांचे कर्ज वाटप
अजय बोराडे - भराडी :
बचत गट म्हटलं, की प्रामुख्याने नजरसेमोर उभा राहतो ते महिलांचा बचत गट. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी झटणाऱ्या आणि कर्जाने पिछाडलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण बँकेची मूळ संकल्पना उदयास आली. त्यामुळे आथिर्कदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण घडत असताना आपणही या मार्गाचा अवलंब करून आपली आथिर्क घडी बसवण्याचा विचार भराडी येथील माळी समाजातील तरुणांनी केला. अचानक उद्भवणाऱ्या आथिर्क अडचणींना मात करण्यासाठी या तरुणांनी चार वर्षांपूवी पुरुष बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण घडत असताना आपणही या मार्गाचा अवलंब करून आपली आथिर्क घडी बसवण्याचा विचार इथल्या काही तरुणानी केला. आज त्यांच्या बचत गटाच्या सभासदांना लाखो रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे.

आपणही स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी झालो पाहिजे या उद्देश्याने हि संकल्पना उदयास आली . भराडी येथील संत सावता पुरुष बचत गट हा अल्पावधीतच नावारूपाला आलेली संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. या बचत गटाने केलेले हे कार्य इतरांना प्रेरणादायी नक्कीच असून इतरांनी अनुकरण करण्याची गरज आहे. २०१४ मध्ये दहा सदस्य संख्या असलेल्या बचत गटाने आज शंभरी ओलांडली आहे.
* १०० % वसुली व नियमाचे काटेकोर पालन :
बचत गट सभासदांना वेळेवर मासिक बचत व कर्ज हप्ता भरण्याची चांगली सवय लागल्याने दर महिन्याला बचत गटाची १०० % वसुली होते. दर महिन्याला होणार्या मासिक मिटिंग साठी सर्व सदस्य हजर असतात. सर्व सभासद नियमांचे काटेकोर पालन करत असल्यामुळे बचत गटाने अप्ल्पवाधीतच नावारूपास आले आहे.
* कमी व्याजदर व किचकट प्रक्रियेमधुन मुक्तता :
अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत असल्याने बँकेत किंवा इतर आर्थिक संस्थेकडे चकरा माराव्या लागत नाही. अत्यंत सुटसुटीत व सोप्या प्रक्रियेतून तत्काळ कर्ज मंजूर होत असल्याने सदस्यांची किचकट प्रक्रियेतून मुक्तता झाली आहे.
* विविध कार्यक्रमांतून समाज प्रबोधन :
बचती सोबतच समाजबांधवाचे विविध कार्यक्रमातून समाज प्रबोधन करून चांगले विचार अंगीकाराचे कामही या बचत गटाने केले आहे. समाज एकसंध होऊन समाजाचा सर्वांगाने विकास झाला पाहिजे या उद्देश्याने हे उपक्रम राबविले जातात. २०१५ मध्ये येथील संत सावता महाराज मंगल कार्यालयात व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी एकत्र येत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले होते. या सोबतच विविध थोर महान पुरुष्यांचे जयंत्या व पुण्यतीथ्या सुद्ध्या साजरा केल्या जातात.
या सोबतच प्रत्येक महिन्याच्या मासिक मीटिंग मध्ये व्यसन मुक्ततेचा संदेश दिला जातो. व अनेकांना व्यसनांपासून परावृत्त केले जाते.
*गरजूंना लाखो रुपयांचं कर्जवाटप :
या बचत गटामार्फत विविध क्षेत्रातील जसे भाजीपाला व्यावसायिक , पानटपरी चालक , किरण दुकान, मोबाईल शॉपी , कापड दुकान , गरेज , ऑटोमोबाईल , चप्पल दुकान , जनरल स्टोरे , यासह विविध गरजवंताना संस्थेने लाखो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
चार वर्षांत विविध गरजू शेतकरी व व्यावसायिक व नवतरुनाना लाखो रुपयाचे कर्ज संथेने वाटप केले आहे. सुख दुख अडी नडीला, शेती साठी , नवीन व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यांत संस्था नेहमी तत्पर राहिली आहे. अनेक वेळा शेतकरी बांधवाना पेरणी व इतर शेती साठी सावकाराकडे हातपाय पसरण्याची गरज पडते. परंतु अल्प मासिक बचतीतून पुरेसे कर्ज उपलब्ध होत असल्याने कुणापुढेही हातपाय पसरवण्याची गरज पडत नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें