औरंगाबाद शहरात वाढते गुन्हे ही गंभीर समस्या, आमदार इम्तियाज जलील यांच प्रतिपादन.
गेल्या काही दिवसात औरंगाबाद शहरात झालेल्या 3 हत्या यामुळे शहरातील कायद्या आणि सुव्यवस्था राखली जात नसल्याच सिद्ध होत आहे. ही समस्या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभिर आहे. औरंगाबाद शहरात रोहिला गल्ली, कैंटोनमेंट आणि रौझ भाग या परिसात गेल्या काहि दिवसात 3 खून झाले. शहरातील वाढती गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यास पोलिस यंत्राणा असमर्थ आहे, अस मत मध्य औरंगाबाद शहराचे ए आय एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केल. शनिवारी रात्री एका 22 वर्षीय तरुणाची रौझ बाग परिसरात निर्घ्रुण हत्या करण्यात आली. पोलिसांनी हा खून खाजगी भांडणातून झाला आसल्याची नोंद केली आहे. आणि खून झालेला हा अमली पदार्थांशी संबंधित होता ही माहिती मात्र लपवून ठेवली. शहरात चरस गांजा या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सूरु आहे आणि औरंगाबाद हे अमली पदार्थांचे केंद्र आहे ही माहिती पोलिस लपवून ठेवत आहेत. अमली पदार्थांची विक्री पोलिसांच्या डोळ्या देखत सूरु असून पोलिस त्याकडे दुर्लक्ष का करत आहेत याच कारण सर्वज्ञात आहे, अस जलील म्हणाले. याच बरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरातील औषध दुकानातून होत असलेल्या अमली पदार्थ जनक गोळ्याची विक्री यावर लक्ष देण गरजेच आहे. ही औषध लहान आणि तरुण मुले व्यसन करण्यासाठी वापरतात. जलील पुढे म्हणाले की, ते लवकरच मुख्यमंत्र्यांना आणि पोलिस महासंचालक यांना भेटून औरंगाबाद शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थांची विक्री यामध्ये लक्ष घालण्यास सांगणार आहेत. हा विषय अपण नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मांडला असून मराठवाड़ामध्ये अमली पदार्थांची विक्री सर्रास सूरु असून औरंगाबाद हे त्यांच् केंद्र होत आहे पोलिसांच्या संमती ने हे प्रकार सूरु आहेत याकडे लक्ष वेधुन घेतल. याकामी पोलिस यंत्राणा अयशस्वि ठरत असेल तर आम्ही या विरिधात मोठ आंदोलन करू असा इशारा जलील यांनी दिला आहे.
Tezznews24 web news channel
Editor= Anwar pathan
Contact.no.8888375846
Tezznews24 web news channel
Editor= Anwar pathan
Contact.no.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें