- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 जनवरी 2018

सेलुत स्वच्छता संकल्प रँलीला प्रतिसाद

समशेर खान
◆सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी सह, शालेय विद्यार्थी व विविध देखावे ठरले सेलु करांचे आकर्षण.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 यात सहभाग नोंदवुन सेलु शहराला स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणुन दर्जा प्राप्त करुन देण्याच्या हेतुने आयोजीत स्वच्छता संकल्प रँलीला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थी व त्यांनी सादर केलेले स्वच्छतेचा संदेश देणारे देखावे सेलुकरांचे आकर्षण ठरले. शहरातील टिळक पुतळा परिसरापासुन गुरुवार 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता स्वच्छता संकल्प रँलीची सुरुवात झाली. प्राजक्ता माळी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार आर्पण करण्यात आला. संकल्प रँलीच्या दर्शनी भागात बँन्ड पथक व त्यामागे रँलीचे नेतृत्व करणारे स्वच्छता दुत जयप्रकाश बिहाणी व नंदकिशोर बाहेती यांच्यासह नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, कांचन कोरडे, डाँ. सुनिल कुलकर्णी, आदींनी रँलीचे नेतृत्व केले होते त्यामागे उघड्या गाडीतुन सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी सेलुकरांच्या प्रतिसादाला दाद देत होत्या त्यामागे शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी स्वचतेचा संदेश देणारे फलक हातात घेवुन सहभागी झाले होते. तसेच शहरातील नागरीक ही मोठ्या संख्येने रँलीत सहभागी झाले होते. तसेच विविध शाळेतील विद्यार्थी तयार केलेले देखावे, नगरपालिकेचे कर्मचारी आदींनी रँलीत सहभाग नोंदविला होता. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासुन निघालेली संकल्प रँली सुभेदार गल्ली, ब्राम्हण गल्ली, फुलारी गल्ली, मारवाड गल्ली, शनिवार बाजार, गोविंद बाबा चौक मार्गे नगरपालिका परिसरात स्वच्छता संकल्प रँलीचा समारोप झाला.
◆भारताच्या स्वच्छतेसाठी शालेय विद्यार्थी महत्वाचे ---प्राजक्ता माळी
आजचे शालेय विद्यार्थी म्हणजे आमची पुढची पिढी असुन सर्व शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची जबाबदारी स्व:ताकडे घेवुन स्वच्छ भारतचे ब्रिद प्रत्यक्षात उतरिविण्याचे अवाहन सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केले आहे. त्या गुरुवार 4 जानेवारी स्वच्छता संकल्प रँलीच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्याधिकारी देविदास जाधव, स्वच्छता दुत जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डाँ. शरद कुलकर्णी, माधुरी जगताप, मनिष कदम, रहिम पठाण, विश्रांती जाधव,श्रीमती जाधव, उषा दौड, विठ्ठल काळबांडे, बाळु झमकडे, शोभा कोरडे,वाहिद अन्सारी, आयुब अमिनोद्दीन,अशोक कासार, यावेळी बोलतांना प्राजक्ता माळी म्हणाल्या की,आजची संकल्प स्वच्छता ही रँली व त्यांना शहरातील नागरीकांनी दिलेला प्रतिसाद हे पाहुन मि भारावुन गेले त्यामुळे हे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने वरच्या क्रमांकावर येवु शकते याची मला खात्री वाटते संकल्प रँलीचा उद्देश्य हा जनजागृती साठी असतो आणी तो उद्देश्य या शहरात निश्चित सफल होईल अशी मला अशा वाटते कारण या शहरातील विद्यार्थी व नागरीक यानी आज मोठा प्रतिसाद दिला विद्यार्थ्यानी यापुढे स्वच्छतेच्या संदर्भात आपले आई वडिल शिक्षक यांच्याशी तडजोड न करता त्यांना शिस्त लावावी तसेच यापुढे प्रत्येक विद्यार्थ्यानी मनाचा निश्चय करावा की मि कचरा रस्त्यावर टाकणार नाही जेणे करुन विद्यार्थ्यांनी ठरवले तर आपला देश सुंदर देश व स्वच्छ देश होण्यासाठी वेळ लागणार नाही असेही यावेळी बोलतांना प्राजक्ता माळी यांनी स्पष्ट केले.
◆स्वच्छतेच्या प्रथम क्रमांकासाठी  --नगराध्यक्ष विनोद बोराडे
सेलु शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवरील सर्वक्षणात स्वच्छतेच्या बाबतीत 192 क्रमांकावर आहे .ही क्रमवारी केवळ शहरातील नागरीकांच्या प्रतिसादांमुळे मिळालेले आहे यात अजुन नागरीकांची साथ मिळाली तर हा क्रमांक 192 वरुन एकवर येवु शकतो आणि नगरपालिका प्रशासन स्वच्छतेसाठी सेलु शहर क्रमांक 1 चे शहर होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष बोराडे यांनी दिली तसेच ते म्हणाले की, शहरातील नागरीकांनी स्वच्छता अँप द्वारे घाणीचे फोटो पाठविल्यास 24 तासाच्या आत पालिका प्रशासन स्वच्छता करेल तसेच घंटा गाडीची मागणी केल्यास तात्काळ घंटा गाडी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी, बोलतांना स्पष्ट केले.
◆स्वच्छतेचे स्वागत
पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्वच क्षेत्रातील स्वच्छतेसाठी पुढाकार घेणा-या व्यक्तीचा प्रातिनिधक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यात शाळेतील स्वच्छतेसाठी भगवान पावडे, योगेश ढवारे, एन. एम. गायकांबळे, जि. ए. होलगिरे, ए. जी. लोंढे, थोरे आदी शिक्षकांना गौरविण्यात आले शहरातील स्वच्छ रुग्णालयासाठी शरयु रुग्णालयाचे डाँ. सुनिल कुलकर्णी तर स्वच्छ उपहारगृहासाठी वृदांवन उपहार गृहाचे जाधव यांचे स्वागत करण्यात आले तसेच शहरातील सर्वत स्वच्छ विद्यालय म्हणुन नुतन विद्यालयाचे मुख्याध्यपक के. व्ही. वाघमारे व अनिल कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले.स्वच्छतेसाठी सदैव अग्रेसर राहणारी घंटा गाडी म्हणुन घंटागाडी चालक देविदास पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पुरस्कार प्राप्त नुतन महाविद्यालयाचे प्राध्यापक के.डी. वाघमारे व जिवन गौरव पुरस्कार प्राप्त महेमुद सर तसेच सुवर्ण पदक प्राप्त उर्मील खोना यांचा ही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच स्वच्छता संकल्प रँलीत सहभाग शाळात नुतन कन्या प्रशाला, नुतन विद्यालय, केशव बाबासाहेब विद्यालय, यशवंत विद्यालय, विवेकानंद विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कुल, माडर्न इंग्लिश स्कुल, कस्तुरबा गांधी विद्यालय, ग्यानतिर्थ विद्यालय, जिजामाता विद्यालय, न्यु हायस्कुल, शारदा विद्यालय, हजरत फाजेमा उर्दु हायस्कुल, शासकिय तंत्र नीकेतन, प्राथमिक शाळा फुले नगर आदी सहभागी विद्यालयातील सहभागी मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला. नुतन कन्या विद्यालयातील विद्यार्थींनीनी स्वच्छतेचा संदेश देणारी प्रतिग्या घेतली यावेळी या प्रतिग्येसाठी व्यासपिठावरील मान्यवर व शालेय विद्यार्थी व नागरीक कटिबद्ध राहिले. यावेळी स्वच्छता दुत म्हणुन नंदकिशोर बाहेती यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी केले सुत्रसंचलन मोहन बोराडे यांनी तर अभार अशोक कासार यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें