खैरुन्निसा उर्दू प्राथमिक शाळेत आनंद मेळावा
अजिंठा ता. 14 (वार्ताहर) शालेय जीवनात फक्त पुस्तकी ज्ञानावर मर्यादित न राहता विदयार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे असे प्रतिपादन अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कीरण आहेर यांनी शानिवारी ( ता. १३ ) केले. येथील खैरुनिसा उर्दू
प्राथमिक शाळेत आयोजीत आनंद मेळयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्तें करण्यात आले. प्रमुख अतिथि म्हणून माजी उप सरपंच अब्दुल अजीज,सचिव जियाउलहक़,केेंद्रप्रमुख फिरोज तड़वी,प्रा.शम्सउलहक़,बावाजीर अली,नेशनल इंग्लिश स्कूल चे शेख जाहिर, मोहम्मद रफ़ी, यांची उपस्थिती होती.
शिक्षणा सोबत विदयार्थ्याना व्यावसायिक ज्ञान मिळावे हा या आनंद मेळयाचा मागचा उद्देश असल्याचे मुख्याध्यापक शेख अफसर यांनी सांगितले. यावेळी विदयार्थ्यांना २२ दुकाने लावली. यात भजे, गुलाब जामुन, फालूदा, पानी-पूरी, दही पूरी, भेळ, कचोरी, समोसा, रगडा, जिलेबी अश्या वेगवेगळ्या खादय पदार्थ विदयार्थ्यांनी विक्रीला ठेवले. यावेळी पालकांनी या पदार्थाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अफसर, शिक्षक शेख रिजवान, शेख जावेद, मजहर खान, नुरुन्निसा बेगम, शेख शबाना, पठान अस्मा, शेख आसिफ, साईद खान, पठान हारून,एजाज खान, बासोलान अब्दुल रहमान, शेख जुनैद, पठाण सालेक, मेराज खान, शेख आवेस अहमद, सैयद वासिम, शेख मोईनउलहक प्रयत्न केले.
फोटोओळ - आनंद नगरीचे उदघाटन करतांना सहायक पुलिस निरीक्षक किरण आहेर, संस्थेचे सचिव जियाउलहक़,माजी उप सरपंच अब्दुल अजीज यांच्या हस्ते करण्यात आल
Tezznews 24 web news channel
Contect.8888375846
Contect.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें