भोकरदन येथे भिमा कोरेगांव भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध !
समाज बांधवाकडुन उपविभागीय अधिकारी कार्यालयवर प्रचंड मोर्चा ;
शे.सलिम
भोकरदन प्रतिनिधी : पाचशे शुर महार योद्ध्यांनी 1 जानेवारी 1818 रोजी भिमा कोरेगांव येथे पेशवाईंचा खात्मा केल्याच्या घटनेला 200 वष्रे पूर्ण झाल्याबाबत भिमा कोरेगांव येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भिम सैनिक जमले असतांनाच काही जातीयवादी समाज कंटकांनी महिला पुरुष व अबालवृद्धावर अमानुषपणे दगडफेक केली . तसेच वाहनाच्या काचा फोडल्या .त्यात एका भिम सैनिकांचा मृत्यू झाला . या घटनेचा भोकरदन येथे भिम सैनिकांकडु या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत भोकरदन बंदची हाक दिली . तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयवर प्रचंड मोर्चा काढण्यात आला .शहरातील व्यापार्यांनी दुकाने बंद करुन प्रतिसात दिला
भोकरदन येथील नवे भोकरदन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन मोर्चाला सुरवात करण्यात आली . मोर्चा शिवाजी महाराज पुतळा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला . यावेळी मोर्चाकंरानी राज्य शासना विरुद्ध घोषणा बाजी करत घटनेतील आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली . त्यानंतर उपविभागीय अधिकारी हारीचंद्र गवळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक बोर्डे, गणेश साबळे, प्रभाकर दांडगे , सुभाष साळवे, बाबासाहेब पगारे, दिपक दांडगे, सुरेश पैठणे .सुरेश बनकर , युवराज पगारे , सचिन पारखे, माजी नगराध्यक्ष रेखाताई पगारे, कमलकिशोर जोगदंडे, इश्वर पारखे, प्रदीप जोगदंडे, प्रकाश सुरडकर , दिपक वेलदोडे, गंगाधर कांबळे, रमेश पगारे, विजयानंद पगारे, विनोद जाधव , सोनु पगारे , मिथुन पगारे , भगवान साळवे , शामराव साळवे, ज्ञानेश्वर रगडे , दिनेश सोनवणे , अनिल घोरपडे , विशाल मिसाळ, गौतम साळवे, प्रवीण आढावे , यांच्या सह महिला व पुरुष तसेच युवा भिम सैनिकांची मोठ्या संख्येने सहभागी होते,
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें