भोकरदन नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम
शेख सलिम.
प्रतिनिधी.भोकरदन
: भोकरदन शहरात रफीक कॉलनी प्रभाग क्र ५ पासून शुक्रवारी स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली.शहरात विविध ठिकाणी घानीचे सम्राज्य पसरलेले होते,अखेर प्रभाग क्र ५ मधून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली पालिकेने स्वच्छतेविषयीं तक्रारसाठी हायटेक पद्धत्तिने स्वच्छता अॅप(swachhata mohua) तयार केले असून त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या तक्रार करता येणार आहे .त्यासाठी नगराध्यक्ष मुख्याधिकारी नगरसेवक आदिसह कर्मचारी स्वच्छता अभियानासाठी जोमाने कामाला लागले आहेत.यावेळी रफीक कॉलनीसाठी स्वच्छता दूत म्हणून शहरातील शिक्षक अब्दुल कुद्दुस सर यांची निवड करण्यात आली. प्रभाग ५ मधील नागरिक अनेक दिवसा पासून घाणीच्या सम्राज्यात जीवन जगत होते व याच प्रभागातून स्वच्छतेला सुरुवात झाली विशेष म्हणजे अशीच स्वच्छता कायम स्वरूपी रहणार की पुन्हा शहर भूतकाळाच्या इतिहासात जमा होणार अशी चर्चा नागरिकांत एकाला मिळत आहे विशेष म्हणजे स्वछता मोहिमेत नगराध्यक्ष मंजुषाताई राजेंद्र देशमुख,नगराध्यक्षांचे पती मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपनगरध्यक्ष इरफ़ान सिद्दीकी,मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे,नगरसेवक तथा गट नेते रणवीर देशमुख,नगरसेवक अ.कदीर बापु ,रिज़वान भाई,हम्दु चाऊस,विजय इंगळे,जफर सेठ, नसीम पठाण,संतोष अन्नदाते,दीपक बोर्डे,रमेश काळे, नगरसेविका आशाताई माळी ,निर्मलाताई,संध्या शर्मा, सर्व नगरसेवक व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व प्रभागमधील नागरिक उपस्थित होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें