- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 दिसंबर 2017

राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक शिबिराचे करंजी येथे उदघाटन संपन्न!

मानवत/मुस्तखीम बेलदार
दि.१५: मानवत येथील  के.के.एम. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विशेष वार्षिक शिबिराचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी दि.१५ डिसेंबर रोजी तालुक्यातील करंजी या  ठिकाणी  संपन्न झाले.
हे शिबीर १५ ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.शिबिराअंतर्गत जलसंवर्धन व्यवस्थापन ग्राम स्वच्छता, लोकसंख्या शिक्षण, आरोग्य जागरण,अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
या शिबिरात मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे  यानी महाविद्यालयीन जिवनाचे महत्त्व समजावून सागितले. जिवनात संघर्ष अटळ असुन यातून प्रगती होते असे त्यांनी यावेळी सागितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे जेष्ठ नेते बालकिशनभाऊ चांडक, अनिलभाऊ नखाते ,नागोराव कदम, सरपंच सुभाषराव जाधव,प्राचार्य ए. बी. चिंदुरवार ,उपप्राचार्य टी.व्ही. मुंडे  ,प्रा.पवन बारहाते, प्रा. योगेश बागूल ,प्रा अंनता मोगल,प्रा.विनायक जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी.बी रवंदे  यानी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमधिकारी प्रा. प्रदीप गिरासे व कैलास बोरुडे यानी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें