Message
मानवत येथील डॉ .आंबेडकर चौंकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेनबत्या लावून बाबासाहेबाना आदरांजली .
मानवत/ मुस्तखीम बेलदार.
दि.०७: मानवत येथिल डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौंकात ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोकप्रिय नगरसेवक राजकुमार खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेनबत्या पेटवून आदरांजली वहाण्यात आली. यावेळी कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर मोरे , दैनिक लोकमत पञकार सत्यशील धबडगे , राजपुत करणी सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष राणासंजय नाईक पञकार मुस्तकिम बेलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानवाच्या प्रतिमेसमोर मेनबत्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संघर्षवादी मिञमंडळाच्या वतीने करण्यात आले होते.सचिव सचिन रनखाबे यांनी प्रस्ताविक केले तर आभार सिध्दांर्थदादा घागरमाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गवळी , विजय खरात , हर्षवर्धन खरात,संतोष ठेंगे ,किरन भदर्गे गजानन बनसोडे ,अशिष धबडगे आदीनी परिश्रम घेतले.यावेळी संघर्षवादी मिञमंडळाचे कार्यकर्त्या सह भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें