आ .गणपतराव देशमुख यांचा एस टी तून उतरतानाचा फोटो प्रसिद्ध झाला .यावरून मला काय वाटले ते विचार वक्त करत आहे
:---------------------
शेकाप चे आकरा वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले व नव्वदीच्या घरात असलेले आदरणीय गणपतराव देशमुख राज्य शासनाच्या एस टी ने नागपूर च्या हिवाळी आधिवेशासाठी सांगोल्याहून आले . सलग ११ वेळा म्हणजे जवळ जवळ 55 वर्षे आमदार राहिलेला हा माणूस साधी जीप घेऊ शकला नाही कारण आयुष्यभर प्रामाणिक पणा जपला . लोक आमदारकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात पण देशमुखांच्या बाबतीत गोष्टच निराळी आहे .त्यांची निवडणूक हि जनता लढवते . ११ वेळेस आमदारकीच्या कारकिर्दीत हा माणूस कोणतीही संपत्ती जमवत नाही हे आजच्या युगात दुर्मिळ उदाहरण आहे . साधा नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य झाला तर सफारी शिवाय फिरत नाही .आमदार खासदार यांची मालमत्ता डोळे दिपवून टाकतात . आमदार स्वतः साठी 30 लाखाची गाडी एका वर्षात घेतो .बायकोला वेगळी गाडी , मुलगा युवा नेता होतो म्हणून त्यासाठी वेगळी गाडी , आमदारींन बाईना हाळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात म्हणून त्यांचा लवाजमा वेगळा असतो .सुनबाईचा थाटच निराळा .हा पैसा कोणाच्या खिशातून येतो याचा आम्ही विचार करत नाही उलट आश्या भ्रष्ट लोकांना समाजात जास्त किंमत मिळत आहे . आदरणीय गणपतराव देशमुख यांचे सारखे राजकारणी सापडणे दुर्मिळ झाले आहे . जनता दलाची राजवट आली त्यावेळेस खेड ( पुणे) या लोकसभा मतदार संघातून हमाल मापाडी चे कार्यकर्ते किसनराव बानखेले खासदार म्हणून निवडून आले पण त्यांनी खासदारकी आपल्या घरात घुसू दिली नाही .किसनराव बानखेले अल्प भूधारक शेतकरी होते ते तसेच राहिले .खासदार झाल्यावर सुद्धा म्हशीचे शेण काढणे कधी चुकले नाही तर त्यांच्या पत्नीने हातातील खुरपे टाकले नाही . पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील चळवळीतील वयोवृद्ध गणपतराव पाटील पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले पण त्यांनी कधी जिल्हा परिषदेची गाडी वापरली नाही .एस टी चा प्रवास सोडला नाही . गणपतराव पाटील उपाध्यक्ष झाले तरी सुद्धा त्यांची पत्नी दुसऱ्याच्या शेतावर मजुरीने जात होती . साखर कारखान्याच्या चेरमन चा तर रुबाबच वेगळा .साखर कारखान्याच्या चेरमन च्या पायाशी तर लक्ष्मी लोळन घालते कारण कारखान्यात ज्या वस्तूला चेरमन हात लावेल तेथून पैसा घेऊन हात बाहेर काढले अशी परिस्थिती आहे .जे चेरमन झाले त्यांनी सहकारी कारखाने दिवाळ खोरीत काढून स्वतः चे खाजगी कारखाने काढले . कुठेही पारदर्शक पणा नाही . पोरींचे लग्न व बापाचा तेरावा घालणारे चेरमन मी पाहिले आहेत पण कै नागनाथ आणा नाईकवाडी यांनी कारखान्याच्या व्यवहारात पारदर्शी पणा येण्यासाठी खरेदी विक्री व्यवहार सर्वांच्या समोर खुला केला . आजही काही चांगली माणसे समाजात आहेत पण समाजास ते नको आहेत .निवडणुकीत जो पैसा वाटेल दारू मटणाची सोय करेल त्यालाच मतदार मतदान करतात हे वास्तव नाकारता येणार नाही . जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार हे निश्चित आहे .गुजरात च्या विधानसभेत 25 टक्के गुन्हेगार आमदार झाले आहेत म्हणजेच लोकांना प्राणिक शुद्ध चारित्र्याचे प्रतिनिधी नको आहेत .आदरणीय गणपत राव देशमुख हे शेवटचे प्रामाणिक लोकप्रतिनिधी असतील .
शनिवार, 23 दिसंबर 2017
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें