- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 दिसंबर 2017

मानवत येथील आरोग्य तपासणी शिबीरात २२० रुग्णांनी घेतला लाभ.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२४:  मानवत  येथील जमियत उलमा शाखाच्या वतिने मोहम्मद  पैंगबर यांच्या जयंती निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आज दि.२४ डिसेंबर रविवारी रोजी  सकाळी १० वाजता ईखरा उर्दु प्राथमीक शाळा गालीब नगर मानवत  येथे  करण्यात आले यात २२० रुग्णांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
.
या आरोग्य तपासणी शिबीराच्या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी हजरत मौलाना सादेक नदवी  तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉक्टर असोशन चे अध्यक्ष डॉ.राजेश तोडकरी,हजरत मौलाना हमीद आलमगीरी, पञकार संघाचे कोषाध्यक्ष भैय्यासाहेब गायकवाड ,मौलाना फहिम पाळोदीकर , मौलाना सलीम मिली ,मौलाना हफिस जावेद   , नगरसेवक अकबर अन्सारी , अँड गणेश मोरे  यांच्या  प्रमुख उपस्थित आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
तर शिबीराचे तपासणी डॉ .निनाद दगडू  , डॉ .शोएब अन्सारी , डॉ .सय्यद रय्यान , डॉ .इमरान हाशमी सय्यद अजेम , जुनेद खान  यांच्या मार्गदर्शना  इ.सी.जी. (ह्रदयकार्यक्षमता तपासणी ) , रक्तदाब तपासणी व आजारावर चर्चा / उपचार  , प्रत्येक सहभागी व्यक्तीशी रिपोर्ट बदल सखोल चर्चा करण्यात आली.यात  २२० रूग्णानी या आरोग्य तपासणी चा लाभ घेतला व रूग्णाना  औषधी मोफत देण्यात आले  नावनोदनी साठी फक्त  दहा रूपये फि ठेवण्यात आली होती . या आरोग्य शिबीराचे सुञसंचालन  मौलाना मुजाहिद मिली यांनी केले तर आभार  रिझवान सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि माजी नगरसेवक नियामत खान ,पञकार ईरफान बागवान सिराज सर , मुजाहिद सर असीर बेलदार ,फुरखान बागवान यांनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें