- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 24 दिसंबर 2017

तेथे जगावयाचा माझा विचार आहे

   मराठी गजल मुशायय्रास सेलूकरांची उत्सफुर्त दाद


सेलू : (समशेर खान)येथील शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक, साहित्य परिषद भारतीय आयोजित आणि गजलनिष्ठ प्रतिष्ठान,महाराष्ट्र प्रस्तूत मराठी गजल मुशायय्रास सेलूच्या चोखंदळ रसिकांनी उत्सफुर्त दाद दिली.
       नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब. गिल्डा सभागृहात गजलकार नाना बेरगुडे गजलमंचावर संपन्न झालेल्या या मराठी गजल मुशायय्राच्या अध्यक्षस्थानी गजलनंदा सुनंदाताई पाटील या होत्या. उद् घाटन प्रा. डॉ. अशोक पाठक यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहूणे म्हणून सर्जेराव लहाने, न.प.सदस्य रहिम खान पठाण, कॉ.अशोक उफाडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार जाहीर झाल्या  बद्दल प्रा. के.डी. वाघमारे यांचा गजलमंचावरील मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन सञात सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सर्जेराव लहाने यांनी केले.तर उद् घाटन सञाचे सुञसंचालन माणिक पुरी यांनी केले.
     वा..वा.. क्या बात है,  बढीया, मस्तच, अप्रतिम अशा भावनांनी रसिकांनी गजलकारांच्या गजलेला उत्सफुर्त दाद दिली. कधी टाळ्यांचा गजर, तर कधी हस्याचे कारंजे यामुळे सभागृहातील वातावरण गजलमय झाले होते.
भावास सोबतीला घेऊन चालले मी
पुसले मला जगाने हा कोण यार आहे
कुल्टा कुणी म्हणावे निंदा कुणी करावी
शस्ञाहुनी जगाच्या जिव्हेस धार आहे
जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले
तेथे जगावयाचा माझा विचार आहे
       जग बदलले मात्र स्ञियांकडे बघण्याची  पुरूषी मानसिकता बदलली नाही ही व्यथा आपल्या गजलेतून गजलनंदा सुनंदाताई पाटील यांनी मांडतांच सर्व सभागृह अंतर्तमुख झाले.
तू वेदना झालीस अन् तू आसवांची प्रार्थना
गाऊन घेतो मी तुला गझलेतल्या शब्दांसवे
       नारायण सुरंदसे यांच्या गजलेतील प्रेम भाव ह्रदयाचा ठाव घेउन गेला. तर भूषण अहिर यांनी त्यांच्या मनाची वेदना व्यक्त केली ती अशी,
    आजन्म वेदनेने कित्येक वार केले
आकार घेतला मग माझ्यातल्या कवीने
ऐसे अनर्थ घडले संसार सोडल्यावर
झाली अनाथ पील्ले माझ्या तिच्या सहीने.
       मला गाव नेईल मिरवित आता
किती एकटा मीच गर्दीत आता
सदा जाळले जीवनाने तसेही
सुखे शांत झोपेन अग्नीत आता
    सचिन तारो यांनी जीवनाचे शाश्वत आपल्या या गजलेतून उलगडवले. तर अमृता जोशी यांनी,
भूक असता खोल पोटी
दैवही घेते 'कसोटी'
भांडतो जोरात आपण
कारणे असतात छोटी
हे वास्तव सांगितले अभिजीत काळे यांनी
मी भावना चुरगाळल्या अन् फेकल्या कचय्रामध्ये
पाणावले नाही कधी मग पापण्यांचे कोपरे
   ही गजल तर आत्माराम जाधव यांनी,
    काजळा सारखा रंग माझा तरी
माय माझी  मला तिट लावायची
बर्फगोळा मला खूप पोळायचा
माय जेंव्हा जुनी नोट मोडायची
   ही गजल सादर केली. आत्तम गेंदे यांनी,
   बाप नभाला बघुनी विठ्ठल विठ्ठल म्हणतो
पुष्पक नाही हुडक तो ढग शोधत असतो
  ही शेतकय्रांची मनोभावना आपल्या गजलेतून सांगितली.
     वेदनेचे शेत आहे
     दुःख ताजे देत आहे
     कर सुशोभित स्वर्ग देवा
बाप माझा येत आहे
      अश्विनी विटेकर यांनी ही गजल तर नव्या दमाचा गजलकार संतोष नारायणकर यांनी,
   झाली आहे खोल जखम काळजाला
तू लाव जरासाक मलम काळजाला
स्पर्श तुझा आहे तपास अमृताचा
लाभेल पुन्हा एक जलम काळजाला
गजलेतून सखीकडून ही अपेक्षा व्यक्त केली.
आयुष्याची किंमत राजा मरणानंतर कळते
लाख सोयरे प्रेत एकटे सरणावरती जळते
    या गजलेतून रत्नाकर जोशी यांनी जीवनाचे दाहक वास्तव मांडले. गजलकार अरविंद सगर यांच्या बहारदार सुञसंचलनाने मराठी गजल मुशायरा वरचेवर रंगतच गेला. सरत्या वर्षाला निरोप आणि येणाय्रा नववर्षाच्या स्वागताचा  हा सुरेश हिवाळे, गुगलीकार शरद ठाकर आणि दिगंबर रोकडे या कवी मिञांनी सेलूकरांना दिलेला गजलांचा अनोखा नजरांना मनमुराद हसवून, आनंद देऊन गेला. आभार प्रदर्शन एकनाथ जाधव यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.नागेश कान्हेकर,किशन कटारे, रमेश नखाते आणि शब्दसह्याद्रीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें