साईबाबा बँकेला 'बँको पुरस्कार' जाहीर
समशेर खान.
सेलू :- अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बँको पुरस्कार-2017 सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली.
सेलू :- अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बँको पुरस्कार-2017 सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली.
सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या सहकारी बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. सन 2017 यावर्षीच्या बँको पुरस्कारासाठी तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संपूर्ण भारतामधील नागरी सहकारी बँक व्यवसाय रू. 51 ते 100 कोटीपर्यंत या विभागामध्ये पात्र ठरल्यामुळे साईबाबा नागरी सहकारी बँकेची निवड करण्यात आली आहे. हैदराबाद येथील नोवाटेल एअरपोर्ट या हाॅटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 18 ते 20 जानेवारी 2018 रोजी 'अॅडव्हान्टेज 2018' या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी साईबाबा बँकेच्या शिष्टमंळाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. साईबाबा नागरी बँकेने अल्पावधीत यशोशिखर गाठून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचे चंद्रशेखर मुळावेकर, जयप्रकाश बिहाणी, प्रवीण बिनायके, सुरेंद्र गिल्डा, भगवानराव गजमल, गंगाधर आडळकर, दत्तात्रय आंधळे, सुरेंद्र तोष्णीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें