- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 दिसंबर 2017

जिंतूरात टुलिप्सच्या चिमुकल्यांचे निरनिराळ्या वेशभूषेतून कलाविष्कार
* एक शतक विद्यार्थ्यांनी नोंदविला सक्रिय सहभाग
* पाल्यांच्या सादरीकरणातून पालकांनी लोटला मनमुराद आनंद

मौ.सिराजोद्दीन नदवी.
जिंतूर.प्रतिनिधी.

जिंतूर शहरातील टुलिप्स इंग्रजी शाळेत ग्रहण करीत असलेल्या विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी रविवार 3 डिसेंबर रोजी न.प.च्या मौलाना आझाद सभागृहात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एक शतक चिमुकल्यानी निरनिराळ्या वेशभूषेतून स्वतःमधील कलाविष्काराचे सादरीकरण केले तर आपल्या पाल्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांचा पालकांनी मनमुराद आनंद लोटला.
                    शहरातील न.प.च्या मौलाना आझाद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मोहम्मदी परवीन यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोउपनि सय्यद अनिसा, डॉ इरफान आगाई पटेल, शेख रफिक, राफीकुर रहेमान, अब्दुल रहीम आदींची उपस्थिती होती. तर परीक्षक म्हणून अश्विनी ढाकणे, विजय ढाकणे हे उपस्थित होते. या वेशभूषा स्पर्धेत टुलिप्स इंग्रजी शाळेतील शंभर चिमुकल्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून वर्तमान पत्राचे महत्व, भारतीय नवीन चलनाची माहिती, प्लास्टिक पिशवीचे दुष्परिणाम, जीएसटी जनजागृती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता, निरोगी आरोग्याचे महत्व, वाहतूक नियमांचे पालन, व्यायामचे महत्त्व आदी गहन विषयावर निरनिराळ्या वेशभूषा परिधान करून चिमुकल्यानी सामाजिक, आरोग्य तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. यामध्ये सैफ शेख, हनजला शेख, बुशरा अफसर, रेहान हाश्मी, समारा, आखीब खान, जोहरा, रमशा, अलिना खान, तरबेज या दहा चिमुकल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन शाळेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी पाल्यांनी साकारलेल्या निरनिराळ्या वेशभूषेतून साकारलेल्या कलाविष्काराचे पालकांनी मनमुराद आनंद लोटले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका जया कुमठेकर यांनी केले तर आभार सादिया खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक मुख्तार खान, मुस्ताक खान आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें