एकमतचे पत्रकार सापवाले यांच्यावर प्राणघातक हल्ला, जिल्ह्यात सर्वत्र निषेध
प्रतिनिधी
उस्मानाबाद : भूम येथील दै. एकमतचे पत्रकार शब्बीर कादर सापवाले यांच्यावर काल दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असुन हल्ला करणाऱ्या माथेफिरू विरोधात भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शब्बीर यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जिल्हाभरातील पत्रकारांनी निषेध केला असुन आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शब्बीर कादर सापवाले हे काल दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भूम येथील नगर पालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील महावीर मेडीकल दुकानातुन औषध घेत होते. यावेळी आरोपी गजानन चंद्रकांत बाराते याने सापवाले यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी सापवाले यांनी शिवी का देतो असे विचारले असता तु मला ओळखत नाहीस का? असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली व त्याने खिशातुन चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या अंगठ्याला व पोटाला जखम झाली असुन त्यांच्यावर सध्या भूम येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत भूम पोलिस ठाण्यात आरोपी बाराते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
जिल्हाभरात निषेध
दरम्यान या घटनेची माहिती कळाल्यानंतर या भ्याड हल्ल्याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी निषेध केला असुन निषेधाचे निवेदनही पोलिस अधिक्षक, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे.
उस्मानाबादेत निषेध, पत्रकारांचे पोलिस अधिक्षकांना निवेदन
पत्रकार शब्बीर कादर सापवाले यांच्यावर झालेल्या भ्याड प्राणघातक हल्ल्याचा निषेध आज उस्मानाबाद शहरातील पत्रकारांनी केला. या निषेधाचे निवेदन पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनाही देण्यात आले. तसेच आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी पत्रकार रविंद्र केसकर, हुंकार बनसोडे, विठ्ठल पाटील, दिलीप पाठक नारीकर, चंद्रसेन देशमुख, राजा वैद्य, संतोष जाधव, मोतीचंद बेदमुथा, संतोष हंबीरे, अमरसिंह भातलवंडे, बाबुराव चव्हाण, सयाजी शेळके, आकाश नरोटे, प्रविण पवार, मल्लीकार्जुन सोनवणे, आरीफ शेख, राहुल कोरे, रियाज शेख, पांडूरंग मते, राजकुमार गंगावणे, अमोल गाडे, चित्रकांत हजारे आदि उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें