महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
*बिलवर मिटरचे फोटोच नाही*
*कोणाचे राग कोणावर**नवीन मिटर ठरत आहे डोकेदुखी*
(शेख सलिम भोकरदन)
सध्या विज वितरण कंपनी कडुन ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडत असलातरी या वर महावितरण कंपनीच्या वतीने सर्व सामान्य नागरीकाना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे या विषय सविस्तर वृत्त असे की शहरातील महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना जी बिले दिले जाते त्यात मिटरचे कोणतेही फोटो नसल्यामुळे नवल वाटत आहे कारण वीज वितरण कंपनीचे मनमानी कारभारामुळे याचा नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर वीज वितरण कंपनीला कोणी वाली नसल्यामुळे शहरात हे गंभीर प्रकारावर परदा टाकण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे कडते आणी जी व्यक्ती या विषय जर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचार पुस करण्यासाठी जात आहे तर यात फक्त जाणकारांनाच याचीखरी खोटीमाहीती दिलीजात असल्याचे आरोप सामान्य नागरीकाकडुन केला जात आहे मोहत्वाचे म्हणजे येथील एका गॅरेज मालक प्रल्हाद पवार यांना विज वितरण कंपनीच्या वतीने बिल आले पण त्या बिलात मिटरचे फोटोच नसल्यामुळे अव्वाचे सव्वा बिले कंपनी कडुन आकारले जात असल्याचे अनेक आरोप शहरात होत आहे कारण बिल वर फोटो नसल्यामुळे चालु रिडींग कीती आणी मागील कीती हे कळने कठीण बनले आहे बिल आले तर ताबडतोब भरणा केली जाते या विषय कोणतीही चौकशी केली जात नाही असे विज बिल भारणारे पण अनेक विज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे मात्र या गंभीर प्रकाराकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे अनेक विज ग्राहकांनी सांगितले आहे दरम्यान जर विज बिल शिल्लक आले तर ते कमी करता येतनही यात टप्प्यात भरण्यासाठी कंपनी कडुन सवलत दिली जात असली तरी नेमके मिटर एवढे रीडिंग का मारत आहे हे कळत नसल्याचे विज ग्राहकांनी सांगितले आहे या संदर्भात येथील विज वितरण कंपनीच्या अभियंता यांना भ्रमणध्वनी केली असता त्यांनी याचा उत्तर दिले नाही तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष करण्याची मागणी केली जातआहे आणी बिलावर मिटरचे फोटो का येत नाही याची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी रोष व्यक्त करून नागरीकांनी केला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें