- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 दिसंबर 2017

*भोकरदन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कुऱ्हा मांडवा येथील घटनेतील आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी* ● *स्वा. सावरकर प्रतिष्ठाण तर्फे हनुमान मंदिरात मृत माकडास वाहिली श्रद्धांजली*

            भोकरदन दि.१९ प्रतिनिधी
           भोकरदन शहरात स्वा. सावरकर प्रतिष्ठाण तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन रिसोड तालुक्यातील कुऱ्हा मांडवा भागात जखमी झालेल्या माकडास अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्यात आल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर हनुमान मंदिरात घटनेत मृत झालेल्या त्या माकडाच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रत्यक्ष हनुमानाचा अवतार समजल्या जाणाऱ्या माकडास निर्दयपणे मारून प्रेताची प्रतारणा करणाऱ्या त्या घटनेचा तीव्र निषेध करून त्या क्रूर आरोपीस कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. 
        याविषयी अधिक माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील कुऱ्हा मांडवा येथे जखमी अवस्थेतील एका माकडाला जिवंत मारून त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा केल्याची  घटना घडली होती व त्याची चित्रफीत सामाजिक माध्यमावर दिसली. या चित्रफितीमध्ये माकडाला जखमी करून अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्याचे दिसत आहे. माकडाला मारणारा निर्दयी युवक एवढ्यावरच न थांबता त्याने मृत माकडाला झाडाला उलटे टांगून खेटराने बडविल्याची बाबही समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या आणि अत्यंत संताप निर्माण करणाऱ्या या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. भोकरदन येथील जुनी तहसील परिसरातील हमुमान मंदिरामध्ये दि.२० रोजी स्वा. सावरकर प्रतिष्ठाण व प्रतिष्ठित नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी मृत माकडाच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वा सावरकर प्रतिष्ठाण चे अध्यक्ष रितेश देशपांडे, गजानन शास्त्री सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पैठणे, प्रतिष्ठाण चे मनोज देशपांडे,अंकुश शास्त्री, चैतन्य देशपांडे, विराम चिने, उदय कुलकर्णी, गणेश देशपांडे, सत्यवान जंजाळ, अमृत देशपांडे, अतुल देशपांडे, गजानन पैठणकर, दीपक गायकवाड,रत्नाकर शास्त्री, सुधीर कुलकर्णी रामेश्वर मोरे,संजय इंगळे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें