- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 दिसंबर 2017

मोहम्मद पैंगबर सल्ल. यांच्या जयंती निमित्त

जमियत उलमा मानवत शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन .


मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२२: मानवत  येथील जमियत उलमा शाखाच्या वतिने मोहम्मद  पैंगबर सल्ल.यांच्या जयंती निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि २४ डिसेंबर रविवारी सकाळी १० वाजता इकरा उर्दू प्राथमिक शाळा गालीब नगर मानवत  येथे  करण्यात आले आहे .
या आरोग्य तपासणी शिबीराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमियत उलमा चे  प्रदेशाध्यक्ष हाफेज नदीम साहाब सिद्दीकी तर प्रमुख पाहुणे म्हणुन  आमदार मोहन फड ,जुनैद भैय्या दुर्राणी  ,हजरत मौलाना मो. सादेक साहाब नदवी, डॉ .अंकुश लाड, अँड गणेश मोरे , यांच्या  प्रमुख उपस्थित आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तर शिबीराचे तपासणी डॉ .निनाद दगडू  , डॉ .शोएब अन्सारी , डॉ .सय्यद रय्यान , डॉ .इमरान हाशमी  यांच्या मार्गदर्शना इ.सी.जी. (ह्रदयकार्यक्षमता तपासणी ) , रक्तदाब तपासणी व आजारावर चर्चा / उपचार  , प्रत्येक सहभागी व्यक्तीशी रिपोर्ट बदल सखोल चर्चा करण्यात येणार आहे तर नावनोदनी साठी फक्त  दहा रूपये फि ठेवण्यात आली आहे .तरी शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान जमियत उलमा शाखा मानवत च्या वतिने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें