मानवत येथील वाल्मीकी समाजाच्या वतीने सलमान खान याच्या वक्तव्याचा जाहिर निषेध.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२२: हिन्दी चिञपट अभिनेता सलमान खान व अभिनेञी शिल्पा शेट्टि यांनी वाल्मीकी समाजाबद्दल जातीवाचक व अपशब्द काढल्याबद्दल मानवत येथील वाल्मीकी समाजाच्या वतीने सलमान खान याच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करुन त्याच्यावर ॲट्रोसीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन आज दि.२२ डिसेंबर रोजी तहसिलदार मानवत व पोलीस अधिक्षक मानवत यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,हिन्दी चिञपट अभिनेता सलमान खान व अभिनेञी शिल्पा शेट्टि यांनी झी.बॉलीवुड व यु.टि.व्ही.स्टार या चँनलवर मुलाखात देताना वाल्मीकी समाजाबद्दल भंगी हा जातीवाचक अपशब्द वापरला त्यामुळे वाल्मीकी समाजात तिव्र असंतोष व नाराजी पसरली असुन संपुर्ण वाल्मीकी समाज व दलीत समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल सलमान खान व अभिनेञी शिल्पा शेट्टि यांचा जाहीर निषेध करण्यात येत असुन सलमान खान व शिल्पा शेट्टि याच्यांवर ॲट्रोसीटी ॲक्ट १९८९ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा वाल्मीकी समाज संघटना व ईतर दलीत बांधवाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर भारतीय वाल्मीकी समाजाचे तालुकाध्यक्ष मोहन कागडा,तालुका सल्लागार अजीत वाल्मीकी ,भारिप बहुजन महासंघाचे मा.जिल्हाध्यक्ष धम्मपाल सोनटक्के , ता.सचीव लचपाल बौत,रिपाई शहर सचीव पाथरी सिध्दार्थ कांबळे, उपाध्यक्ष सुरेश बिर्ला ,सचीव वसंत पंडित ,उपाध्यक्ष मुकेश गायचंड,करण गोरे,दत्ता अवचार ,अणील वाल्मीक,विजय कागडा,सुनील वाल्मीकी आदीच्या स्वाक्षरी आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें