प्रिन्स एकाडमि च्या प्रदर्शनी चे उदघाटन करते वेळी एकनाथ वाळके.श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे व आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी डॉ.विशाल राठोड.
प्रिन्स इंग्लिश एकात्मिक अदिवासी प्रकल्प च्या चिमुरड्याने सादर केला ‘Unity in Diversity’ बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम
सेलू , दि. येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा अंतर्गत प्रिन्स इंग्लिश एकात्मिक अदिवासी प्रकल्प चा‘Unity in Diversity’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम (ता.२०) डिसेंबर बुधवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला
‘Unity in Diversity’ या कार्यक्रमाचे उद्घाटनप प्रकल्प अधिकारी डॉ.विशाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आदिवाशी समाजसेवक पांढरी कोकाटे ,दै.सामनाचे ता.प्रतिनिधी नारायण पाटील,मा.ब्रह्मानंद मोगल ता. अध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस,मा.विशाल देशमुख शहराध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस,मा.एकनाथ वाळके ता.प्रतिनिधी दै.एकमत,मा.माधवराव फोले,मा.पलसराम धिक्कार, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्रिन्स इंग्लिश प्राचार्य ललितकुमार क-हाळे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन, क्रांतीसूर्य बिरसा मिंडा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. आपले उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मा.डॉ.विशाल राठोड म्हणाले की, डॉ.संजय रोडगे यांनी जो शैक्षणिक प्रवाह निर्माण केलेला आहे त्यामध्ये ते अदिवासी विध्यार्थ्यासाठी खूप चांगली मेहनत घेत आहेत.या प्रकल्पा अंतर्गत १८ नामांकित शाळा फक्त याच शाळेचे उलेखनीय कार्य समोर आलेले आहे.अदिवासी विध्यार्थी हे डोंगरात ,रानावनात रहाणारे असल्यामुळे त्यांच्या अंगात कटकता,धाडस हे नैसर्गिक गुण आत्मसात आहेत त्याच गुणांना आकार देणाच काम डॉ.रोडगे करत आहेत.मा.पंढरी कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करतना म्हणाले की, जो पर्यंत आपण डोळ्याने पहात नाही तो पर्यंत विश्वास बसत नाही या उक्ती प्रमाणे,”हैदराबादला गेले तर रामोजी फिल्म सिटी पहावी असे वाटते,पंढरपूरला गेले तर कैकाडी महाराजांचा मठ पहावा त्याचप्रमाणे सेलूला आले तर डॉ.साहेबांची शाळा आवर्जून पहावी.” असे गौरोउदगार काढले.डॉ.रोडगे अदिवासी विध्यार्थ्याची जडणघडण करत आहेत ही उलेखनीय बाब आहे.आपल्या अध्यक्षी समारोपात डॉ.संजय रोडगे म्हणाले की,या आदिवाशी विध्यार्थ्याच्या प्रवेशानंतर घडलेला बदल आपणास पहावयास मिळत आहे.शासनाच्या या योजांतून या अदिवासी विध्यार्थ्याना अतिउच्च दर्ज्याच्या सुविधा देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे व हे सर्व पालकांच्या सहकार्या मुळेच शक्य आहे व हे अदिवासी विध्यार्थी उच्च दर्ज्याचे अधिकारी व्हावेत हेच माझे खरे स्वप्न आहे व हे अदिवासी विध्यार्थी उच्च दर्ज्याचे अधिकारी झाल्यानंतरच माझे खरे स्वप्न पूर्ण होईल. या प्रसंगी मा.ब्रह्मानंद मोगल, विशाल देशमुख आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बालकलाकारणी आपल्या कला प्रकारातून आदिवाशी गीत,नमन गीत, जगदंब गीत,उगवली शुक्राची चांदणी,लावणी,विनोदी नाटिका असे असंख्य कला प्रकार सादर करून रशिक प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णु सिसोदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी अनिल बोराडे, प्रेम सर,जयकुमार बोराडे,गणेश सोनार,सारिका ताठे,अंजली काकडे,रत्नपारखी मीनाक्षी,मेरी मैडम,इंगोले मैडम,रामप्रसाद धर्मे प्रिन्स इंग्लिश एकात्मिक अदिवासी प्रकल्पच्या सर्व कर्मच्या-यानी परिश्रम घेतले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें