भोकरदन शहरात मो.अफराझुलची हत्याचा निषेधार्थ मूक मोर्चा
· जमीअत उलमा हिंद भोकरदन तर्फे *
भोकरदन शहरात जमीअत उलमा हिंद भोकरदन च्या वतीने राजीस्थान येथील मो.अफराझुल यांचा हत्या चा निषेधार्थ मूक मोर्चा उलमा हिंद शाखा भोकरदन च्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चा ची सुरुवात भोकरदन येथील मर्कझ मस्जिद, येथून सुरुवात करण्यात आली पोलीस्थाने परिसर,आंबेडकर चोक, शिवाजी चोक, ते उपविभागीय कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला नंतर उपविभागीय अधिकारी श्री.गवळी साहेब यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे कि ,मागील काही दिवसांपासून सोशल मिडीया व इलेक्ट्रोनिक मिडीया प्रसिध्द झालेल्या व्हिडीओ मध्ये शंभूलाल रेगर या इसमाने मुस्लीम युवकाची हत्या केलेली आहे व त्याला जाळून दिलेले आहे तसेच व्हिडीओ बनविणारा अज्ञात इसम व मो अफराझुल यांची हत्या करणा-या प्रकरणी शंभूलाल यांना सहाय्य करणारे अज्ञात इसम यांना त्वरीत फासीची शिक्षा देण्यात यावी व मो.इफराझुल यांच्या परिवाराला आर्थिक मदत तात्काळ देण्या करीता भारत सरकारला शिफारस करावी ही घडलेली घटना भारतीय संविधानाच्या विरोधाची बाब असून त्या विषयी संपूर्ण देशभरात जाहीर निषेध सुध्दा होत आहे. मो.अफराझुल यांच्या गुन्हेगारांना त्वरीत फासी ची शिक्षा देण्यात यावी व त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. तसेच येरोशेलम येथील मस्जिदे अक्सा बाबत निषेध करण्यात आला. निवेदनावर तालुका अध्यक्ष जमीअत उलमा हिंद, हाफिज शफीक, शहर अध्यक्ष मौलाना हारून, मौलवी मुजीब, हाफिज नसीम, हाफिज नासेर, हाफिज जावेद, हाफिज फेरोज, हाफिज नवीद, मुफ्ती खालीद, हाफिज माजेद, हाफिज अन्सार, मौलाना रहेमान, हाफुज अलीम, मुफ्ती जुनेद, मौलवी इम्रान, हाफिज मोईज, हाफिज इम्रान, हाफिज अब्दुल हमीद, उपाध्यक्ष इरफानोद्दिन सिद्दिकी,नगर सेवक शेख कदीर,समाज सेवक महेबूब भारती, झाकेर पठाण ,नगर सेवक नसीम पठाण, शफिक खान, नगर सेवक शेख रिजवान, एम.ए अजीज, ,सय्यद नासेर, शेख जाहेद, जुबेर कुरेशी, सलमान खान, अनिस भारती, मसूद सिद्दिकी, शेख शाहेद, व इतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील युवक उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें