मानवत येथील डॉ .सचिन खिस्ते यांची अमेरिका येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२२: मानवत येथील रहिवाशी डॉ .सचिन खिस्ते यांची जगातील सर्वेच्य मानल्या जाणाऱ्या मँसेच्युएट्स आणी हार्वर्ड विद्यापिठात संशोधन प्रकल्पावर शास्त्रज्ञ म्हणून त्यांची निवड झाली आहे. कँन्सर या रोगावर जगभर संशोधन सुरू आहे त्यात हार्वर्ड विद्यापिठात जगात सर्वेच मानले जाते याच विद्यापिठातील एका महत्त्वाच्या प्रकल्पावर डॉ सचिन खिस्ते संशोधक म्हणून रजू झाले आहे. मानवत येथिल नेताजी सुभाष विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन नंतर के.के.एम .महाविद्यालयात बारावी पर्यत शिक्षण घेतले त्या नंतर पुणे येथे सिंहगड फार्मसी काँलेज मध्ये त्याने बी फार्मसी चे शिक्षण पुर्ण केले . त्यानंतर डॉ .सचिन खिस्ते यांनी अथांग परिश्रमा नंतर पदव्युतर व पी. एच. डी .चे शिक्षण अमेरिकेतील लुसियाना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये घेतले त्यांनी कँन्सर पेंशींच्या जनुकीय बदलांवर त्याच्या पी.एच.डी.चा प्रंबध होता . मानवतच्या एका सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांने आपल्या अथांग परिश्रमाच्या जोरावर यंश संपदीत केले आणी कमी वयात सर्वेच स्थान गाठले त्याच्या या यशाचे कौतुक होत आसुन मानवत शहरातील नागरीक व शिक्षक ,व त्याचे मिञ आमेर अन्सारी ,विवेक ढवळे , अजय कोकील यांनी त्यांना पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें