प्रिन्स अकॅडेमीचा‘‘क्यूरीओसिटी कार्निवल’’सांस्कृतिक कार्यक्रमजल्लोषात सादर
सेलू , दि. येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा अंतर्गत प्रिन्स अकॅडेमी चा ‘क्यूरीओयासिटी कार्निवल’ हा बहारदारसांस्कृतिक कार्यक्रम (ता.२१) डिसेंबर गुरवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला
‘‘क्यूरीओयासिटी कार्निवल’या कार्यक्रमाचे उद्घाटन सेलूच्या उपविभागीय पोलीसअधिकारी मा.सौ.रेणुका वागळे यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मा.पुरुषोत्तम पावडे सभापती पं.स.सेलू,मा.संतोष सोमाणी संचालक कृ.उ.बा.स.सेलू,मा.कैलास काळे अध्यक्ष पालकशिक्षक संघ सेलू,मा.सौ.मोनिका काला अध्यक्ष शालेयव्यवस्थापन समिती,मा.श्रीपाद कुलकर्णी ता.प्रतिनिधी दै.पुण्यनगरी,मा.संजय विंचू,मा.रामविलास अग्रवाल, मा.आबा शेळके,मा. सुभाष जोशी मा.भूषण कासट, मा.शेख शाहीन,मा.प्रिया ठाकूर,मा.डॉ.मनीषा गुजराती,मा.डॉ.भक्ती नंद,मा.प्रमोद ढालकरी, श्रीराम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ.रामराव रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्रिन्स अकॅडमीच्या प्राचार्या प्रिती सॅम्युअल आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात क्यूरीअस पद्धतीने ‘क्यूरीअस माईन्ड ’ शिक्षणावर आधरित नवीन प्रकल्पचे सॅनरो एज्युकेअर याचे अनावरण व सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी पालकाकडून पालक प्रतिनिधी कैलास काळे व भूषण कासट यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन डॉ.संजय रोडगे यांच्या गौरव करण्यात आला यावेळी भूषण कासट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “ डॉ.रोडगे यांचा हा तर खूप छोटा सत्कार आहे,त्यांचा या शैक्षणीक कार्यामुळे सेलू व सेलू परिसराची खूप मोठी प्रगती झालेली आहे.डॉ.संजय रोडगे दररोज व्हाटस अप फेसबुक या माध्यमातून नवनवीन संकल्पना समोर आणतात व त्याची अमलबजावणी देखील करतात त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.”प्रिया ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्रिन्स अकॅडेमी ही खरोखच एक प्रगतशील शाळा असून या शाळेकडून सतत नवीन शिकायला मिळते.
‘क्यूरीअसिटी कार्निवल’या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,”आज विध्यार्थ्याना प्रश्न पडायला हवेत,त्यानुसार विध्यार्थ्याचा विकास होईल, विध्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढेल,जीज्ञासु वृत्ती निर्माण होईल.त्यामुळे विध्यार्थ्यानी प्रत्येक कृती मध्ये सहभागी व्हायला पाहिजे.पुढे चालून हेच विध्यार्थी आपल्या भारत देश्याचे नेतृत्व करणार आहेत.त्यामुळे त्यांना सक्षम करण्याचे काम प्रिन्स अकॅडेमी सी.बी.एस.ई.अविरत करत आहे व करत राहील.
यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेतील विविध विषयाचे पुरस्कार ईयत्ता १० वीतील गुणवंत विध्यार्थ्याना त्यांच्या पालकासमवेत देण्यात आले.याच सोबत यावर्षीचे “प्रिन्स”हर्ष दीपककुमार माटा व “प्रिन्सेस”मिताली विष्णुदासजी राठी यांना प्रदान करण्यात आले.विशेष करून विज्ञान प्रदर्शनातील गुणवंत विध्यार्थी यांचाही पालकासमवेत प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावर्षी हर्ष दीपककुमार माटा व महेश बोराडे या विध्यार्थ्यानी “रीसोव्हीटा परीक्षा २०१७”यामध्ये जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला व कीर्तिमान स्थापन करून प्रतेकी रु.५०,०००/- शिष्यवृत्ती,एक सायकल व सन्मान चिन्ह प्राप्त केले.या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे यांनी त्यांचे कौतुक करून भविष्यातील यशासाठी शुभेछ्या दिल्या. ‘‘क्यूरीओयासिटी कार्निवल’या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रिन्स अकॅडेमीच्या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली.यामध्ये वुई आर क्यूरीअस,आर्मीगीत, गणेश वंदना,कुचीपुडी नृत्य, वुई आर फैमिली,इत्यादी नाविन्यपूर्ण गीतांची मैफिल रंगवली.त्यासोबत “कल्पना चावला-एक प्रेरणा”या नाटिकेमधून विध्यार्थ्यामध्ये एक ध्येयशील वृत्ती असायला हवी हा संदेश दिला.यावेळी डॉ .संजय रोडगे यांचा जीवनपट उलगडणारे चित्रीकरण दाखवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेरीना असोंगी,शिवानी मलवडे,संध्या शिवपूरे,श्रधा डख कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रिन्स अकॅडेमीतील नारायण चौरे,मिलिंद खंदारे,श्याम देशमुख,अर्जुन गरुड,प्रितम सूर्यवंशी,आनंद रुगले,मदन मानमोडे,रविकुमार,फेलिक्ससर,वैलीकिनी,ग्ल्यान्सी,रीना सूर्यवंशी,रीना ठाकूर,भगवान क्षीरसागर व सर्व श्रीराम प्रतिष्ठानमधील शिक्षक कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें