२३ तारखेला सेलूत मराठी गजल मुशायरा
समशेर खानसेलू : येथील शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक साहित्य परिषद भारतीय आणि गजलनिष्ठ प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्यावतीने शनिवार तारीख २३ रोजी दुपारी ३.३० वाजता नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात मराठी गजल मुशायरा आयोजित केला आहे. या मराठी गजल मुशायराच्या अध्यक्ष गजलनंदा सुनंदाताई पाटील तर उद् घाटक प्रा. डॉ. अशोक पाठक हे आहेत. तर गजलकार बबनदादा चखाले, नारायण सुरंदसे, अमृता जोशी, अश्विनी विटेकर, अभिजीत काळे, भूषण अहिर, जावेद सय्यद, आत्तम गेंदे, आत्माराम जाधव, संतोष नारायणकर, रत्नाकर जोशी यांचा सहभाग आहे. अरविंद सगर हे सुञसंचालन करतील. याच कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रा. के. डी. वाघमारे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें