मानवत येथे रिपब्लिकन सेनेचे शाखाचे उदघाटन .
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२०: मानवत शहरात रिपब्लीकन सेने च्या शाखा उदघाटन चे आयोजन रिपब्लीकन सेनेच्या वतीने आज दि.२० डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
मोढा परिसरात रिपब्लीकन सेनेच्या दोन शाखाचे उदघाटन रिपब्लीकन सेने चे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे याच्या हस्ते करण्यात आले.शाखा उदघाटन कार्यक्रमापुर्वी विश्राम गृह येथे स्वागत समारोह चे कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी मान्यवराचे स्वागत करण्यात आले.युवकांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत सहभागी व्हावे असे अवाहन प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी यावेळी केले. या नंतर आंबेडकर नगर येथे डॉ.बाबासाहेब याच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले व या नंतर शाखेचे उदघाटन करण्यात आले.या शाखेच्या उदघाटनावेळी आरुण लहाने, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, उपाध्यक्ष महेंद्र डांगे, अच्युतराव घुगे, निलेश डुमने, अशोक पंडित, जिल्हा संघटक सुबोध काकडे, बालकिशन साळवे, राणोजी ढाले, अशोक खंदारे, सेलुचे तालुका अध्यक्ष बालासाहेब साळवे, मानवत तालुका अध्यक्ष दिपक ठेंगे, रवि पंडित, नागसेन भदर्गे, विजय खरात, वाजेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशीष धबडगे, आशोक खंदारे, संजय बनसोडे, राजु दवंडे, संघराज साळवे, प्रशांत खरे, यांच्यासह पदाधिकाऱ्यानी प्रयन्त केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें