- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 दिसंबर 2017

आरोपींनी केली पोलिसाला मारहाण  ; गुन्हा दाखल 

पोलिसांमध्ये पसरले भितीचे वातावरण

सेलू : एका प्रकरणात पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी यास पकडण्यात गेलेल्या पोलिसालाच आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने पोलिसांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणुन कार्यरत असलेल्या  रामेश्वर श्रीमंतराव मुंढे (वय२३)  पो.ना. ५६५ या पोलिसाने गुन्ह्यात फरार असलेल्या संतोष वैâलास सोनवणे (वय २४, रा. राजीवगांधीनगर, सेलू) यांच्या शोधात जाऊन त्यास ताब्यात घेण्यासाठी गेला असता आरोपी संतोष सोनवणे याने पोलिस नायक परमेश्वर मुंढे यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करुन आरोपीने जीवे मारण्याची धमकी पोलिसांना दिल्यामुळे आरोपी संतोष सोनवणे यांच्या विरोधात सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मात्र अद्यापही फरार असून त्यास अटक करण्यात  आली नाही. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांमध्ये देखील भितीचे वातावरण पसरले आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें