*पूर्णेत केंद्र सरकारच्या निर्णयाचे प्रहार कडून स्वागत*
मो.अनिस
प्रतिनिधी पूर्णा.
पूर्णा :- शहरातिल प्रहार अपंग संघटनेच्या वतिने दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने दिलेल्या खुशखबरिचे येथील आनंद नगर चौकात फटाके फोडून व पेढ़े वाटून स्वागत करण्यात आले . अपंगांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकारने कायदा लागू केला आहे . व त्याची काटेकोर पणे अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणार्या दिव्यांगांना त्रास देणार्या अथवा अपमानास्पद वागणूक देणार्यांवर यापुढे अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होवून त्याकरता दंड व सहा महिने ते पाच वर्षापर्यंतची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात असल्याने दिव्यांगांना दिलासा मिळाला असल्याचे मत प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कोमटवार यांनी या वेळी व्यक्त करत केंद्र शासनाचे आभार मानले . दिव्यागांसाठी त्रास देणार्यास कारावासाची शिक्षा ठोठावणारा कायदा दि राईटस् ऑफ परसनस् विथ डिसअॅबिलिटीस अॅक्ट 2016 नुकताच केंद्र सरकारने पारीत केला आहे, त्यामधील कलम 92 अन्वये सदरच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सुरक्षेचा देखील अंतर्भाव केला आहे. त्यामुळे यापुढील काळात दिव्यांगांना समाजाकडून सन्मानाची वागणूक प्राप्त होईल. या धोरणात्मक निर्णयामुळे देशातील असंख्य दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समाजाच्या विविध स्तरावर कार्यरत असणा-या दिव्यांगांना अनेकदा असंख्य अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा अपप्रवृत्तीकडून धमक्या त्याचप्रमाणे मानसिक व शारिरीक त्रास दिला जात असल्याच्या असंख्य तक्रारी राज्य व केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अपमानास्पद वागणूक देणे, शारीरिक व मानसिक छळ करणे, धमकी देणे त्यांना आधार देणार्या साधनांना मुद्यामहून त्रास देणे अशा बाबतीतही कडक शिक्षेची तरतूद कायद्यात केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें