- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 दिसंबर 2017

मानवत पंचायतसमीती कर्मचाऱ्यांचा शासनाच्या कर्मचारी कपात धोरणा विरुध्द काळ्या फिती लावुन निषेध आंदोलन .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.११: महाराष्ट्र शासनाने कर्मचारी कपात धोरण व ग्रामविकास विभागाकडिल अन्य दिर्घकाळापासुन प्रलंबीत असलेल्या मागण्या संदर्भात शासनाकडुन जाणीवपूर्वक वेळ काढु धोरण अवलंबीत असल्यामुळे याचा निषेध म्हणुन आज दि.११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद कर्मचारी संघटनाच्या वतीने आज राज्यभर काळ्याफिती लावुन निषेध नोदविण्यात आला आहे.याचाच भाग म्हणुन मानवत पंचायतसमीती कार्यालयातील सर्व कर्मचारीवर्ग यांनी आज धरणे आंदोलन करत काळ्या फिती लावुन आपले दैनंदिन काम सुरु केले व शासनाचा यावेळी निषेध ही करण्यात आला.यावेळी गटविकास आधिकारी छडिदार यांनीही या आंदोलनास पाठिंबा देत काळी फित लावुन काम केले.या वेळी पंचायत समिति मानवत येथे धरने आंदोलन करताना विस्तार अधिकारी वसंत इखे, मधुकर उमरिकर, राज्य संघटनेचे सय्यद सादेख , वसंत वाघमारे,सय्यद इस्माइल , लेखा विभागाचे शेख हमीद, सलेम चाउस, कनिष्ट सहाय्यक ज्योती धुतमल, गाढ़े, वाघमारे चतुर्थ कर्मचारी ठाकुर, श्रीमती फाटे, श्रीमती शेन्द्रे इत्यादि कर्मचारी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें